शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:17 IST

तरुणाने आपल्या आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं. मात्र, नोकरी मिळताच तिने पोटच्या मुलीचाही विचार केला नाही.

प्रेमाची आणि त्यागाची कहाणी कधीकधी किती क्रूरपणे संपू शकते, याचा प्रत्यय बिहारमधील वैशाली जिल्ह्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेतून आला. याच परिसरात राहणाऱ्या एका पतीने आपल्या पत्नीविरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या व्यक्तीने पत्नीवर आरोप करताना म्हटले की, "मी आपल्या आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, तिला सरकारी नोकरी मिळवून दिली, पण आता ती मला आणि आमच्या चिमुकल्या मुलीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली आहे." हा आरोप करतानाच पत्नीच्या अनैतिक संबंधांचाही त्याने पर्दाफाश केला आहे.

पंकज कुमार साह नावाच्या या पतीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे लग्न १० फेब्रुवारी २०२० रोजी पूजा कुमारीसोबत झाले होते. पंकजने आपल्या आईचे दागिने विकून पत्नीला शिक्षण दिले आणि तिला अग्निशमन दलात (फायर डिपार्टमेंट) नोकरी मिळवून दिली. पण, इथेच त्याच्या आयुष्यात वादळ आलं. बिहटा येथील प्रशिक्षणादरम्यान, पूजाची ओळख राहुल नावाच्या एका सहकाऱ्याशी झाली, जो आरा जिल्ह्यातील असून सहरसामध्ये तैनात आहे. याच राहुलसोबत पुढे पूजाचे प्रेमसंबंध जुळले.

नोकरी मिळाली, प्रेमही बहरलं आणि घर तुटलं!७ मार्च २०२१ रोजी त्यांना एक गोंडस मुलगी झाली, जी आता साडेचार वर्षांची आहे. ७ मे २०२३ रोजी पूजाची नेमणूक सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज येथे झाली. एके दिवशी पंकज आपल्या पत्नीला भेटायला सुपौलला गेला असता, त्याला पूजाच्या अनेक अनैतिक संबंधांची कुणकुण लागली. जेव्हा त्याने या संबंधांना विरोध केला, तेव्हा पूजाने त्याला आणि त्यांच्या साडेचार वर्षांच्या मुलीला घरातून हाकलून दिले. या दोन वर्षांत पूजा फक्त चारच दिवसांसाठी आपल्या घरी परत आली होती.

आक्षेपार्ह व्हिडीओ आणि सासरच्यांची धमकीया दरम्यान, पंकजच्या हाती पत्नी पूजा आणि तिच्या प्रियकराचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ लागला. हा व्हिडीओ घेऊन तो आपल्या सासरी गेला, तेव्हा त्याला आणखी मोठा धक्का बसला. सासरच्या मंडळींनी त्याला धमकावले आणि 'जर पूजाला घटस्फोट दिला नाहीस, तर तुला खोट्या प्रकरणात अडकवू', असे म्हटले. या सगळ्या प्रकारानंतर हताश झालेल्या पंकजने अखेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्याने पत्नीविरुद्ध एफआयआर नोंदवून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. पंकजने केलेल्या या आरोपांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश