आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:17 IST2025-06-12T17:15:14+5:302025-06-12T17:17:27+5:30

तरुणाने आपल्या आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं. मात्र, नोकरी मिळताच तिने पोटच्या मुलीचाही विचार केला नाही.

Crime News He sold his mother's jewelry to educate his wife, but as soon as she got a government job, she committed a scandal! Husband goes to the police | आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

प्रेमाची आणि त्यागाची कहाणी कधीकधी किती क्रूरपणे संपू शकते, याचा प्रत्यय बिहारमधील वैशाली जिल्ह्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेतून आला. याच परिसरात राहणाऱ्या एका पतीने आपल्या पत्नीविरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या व्यक्तीने पत्नीवर आरोप करताना म्हटले की, "मी आपल्या आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, तिला सरकारी नोकरी मिळवून दिली, पण आता ती मला आणि आमच्या चिमुकल्या मुलीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली आहे." हा आरोप करतानाच पत्नीच्या अनैतिक संबंधांचाही त्याने पर्दाफाश केला आहे.

पंकज कुमार साह नावाच्या या पतीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे लग्न १० फेब्रुवारी २०२० रोजी पूजा कुमारीसोबत झाले होते. पंकजने आपल्या आईचे दागिने विकून पत्नीला शिक्षण दिले आणि तिला अग्निशमन दलात (फायर डिपार्टमेंट) नोकरी मिळवून दिली. पण, इथेच त्याच्या आयुष्यात वादळ आलं. बिहटा येथील प्रशिक्षणादरम्यान, पूजाची ओळख राहुल नावाच्या एका सहकाऱ्याशी झाली, जो आरा जिल्ह्यातील असून सहरसामध्ये तैनात आहे. याच राहुलसोबत पुढे पूजाचे प्रेमसंबंध जुळले.

नोकरी मिळाली, प्रेमही बहरलं आणि घर तुटलं!
७ मार्च २०२१ रोजी त्यांना एक गोंडस मुलगी झाली, जी आता साडेचार वर्षांची आहे. ७ मे २०२३ रोजी पूजाची नेमणूक सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज येथे झाली. एके दिवशी पंकज आपल्या पत्नीला भेटायला सुपौलला गेला असता, त्याला पूजाच्या अनेक अनैतिक संबंधांची कुणकुण लागली. जेव्हा त्याने या संबंधांना विरोध केला, तेव्हा पूजाने त्याला आणि त्यांच्या साडेचार वर्षांच्या मुलीला घरातून हाकलून दिले. या दोन वर्षांत पूजा फक्त चारच दिवसांसाठी आपल्या घरी परत आली होती.

आक्षेपार्ह व्हिडीओ आणि सासरच्यांची धमकी
या दरम्यान, पंकजच्या हाती पत्नी पूजा आणि तिच्या प्रियकराचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ लागला. हा व्हिडीओ घेऊन तो आपल्या सासरी गेला, तेव्हा त्याला आणखी मोठा धक्का बसला. सासरच्या मंडळींनी त्याला धमकावले आणि 'जर पूजाला घटस्फोट दिला नाहीस, तर तुला खोट्या प्रकरणात अडकवू', असे म्हटले. या सगळ्या प्रकारानंतर हताश झालेल्या पंकजने अखेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्याने पत्नीविरुद्ध एफआयआर नोंदवून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. पंकजने केलेल्या या आरोपांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Crime News He sold his mother's jewelry to educate his wife, but as soon as she got a government job, she committed a scandal! Husband goes to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.