Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:38 IST2025-10-03T15:36:13+5:302025-10-03T15:38:17+5:30
Blue Drum Crime news: तरुणी कॉलेजला गेली होती. पण, ती परतलीच नाही. कुटुंबीयांनी तक्रार दिली. त्यानंतर आरोपीने तिच्या घरच्यांना मेसेज करून हत्या केल्याची माहिती दिली.

Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
निळा ड्रम म्हटलं की अजूनही सौरभ राजपूतची हत्या करणाऱ्या मुस्कानची आठवण होते. अशीच एक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. पण, इथे मित्राने तरुणीला ड्रममधील पाण्यात बुडवून मारले आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह बाहेर काढला आणि नंतर बेडशीटमध्ये गुंडाळून ठेवून दिला. तिच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर आरोपीने त्यांना मेसेज करून सांगितले की, मी तिची हत्या केली आहे.
मध्य प्रदेशातील देवासमधील वैशाली एव्हेन्यू परिसरात ही घटना घडली आहे. भाड्याने घेतलेल्या घरात लक्षिता चौधरी या तरुणीचा मृतदेह सापडला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्षिता तीन दिवसांपासून बेपत्ता होती.
हाथ पाय बांधून मृतदेह रुममध्ये ठेवून दिला
लक्षिता तिच्या मित्रासोबत होती. त्याने तिला रुमवर नेले आणि तिथे नेल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्याने तिला निळ्या ड्रममध्ये बुडवले आणि हत्या केली. एका बेडशीटमध्ये तिचा मृतदेह गुंडाळून ठेवून तो निघून गेला.
वैशाली एव्हेन्यू कॉलनीत राहणारी लक्षिता २९ सप्टेंबर रोजी घरातून बाहेर पडली होती. कॉलेजला जात असल्याचे तिने घरच्यांना सांगितलं होतं. तिच्या कुटुंबीयांनी लक्षिता बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
मी तिची हत्या केलीय, मृतदेह खोलीत आहे
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. लक्षिताचा मोनू उर्फ मनोज चौहान नावाच्या मित्र असल्याची माहिती मिळाली. त्याने १ ऑक्टोबर रोजी मनोज चौहान याने तरुणीच्या कुटुंबीयांना मेसेज केला आणि सांगितले की, मी तिची हत्या केली आहे आणि तिचा मृतदेह त्याच्या घरात आहे.
बेडशीटमध्ये सडलेला मृतदेह
लक्षिताच्या कुटुंबीयांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस त्याच्या फ्लॅटवर पोहोचले. घराचा दरवाजा तोडून आत गेल्यानंतर त्यांना बेडशीटमध्ये मृतदेह दिसला. गरबा खेळण्याचा ड्रेसमध्ये तरुणीचा मृतदेह पडलेला होता. तिचा मृतदेह सडू लागला होता.
पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, त्यानंतर आरोपी मनोज चौहान सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाला.
तरुणीची हत्या का केली?
आरोपी मनोजने पोलिसांना सांगितले की, लक्षिता आणि ते चांगले मित्र होते. पण, ती नंतर दुसऱ्या मुलाशी बोलू लागली होती. त्यामुळे मला या गोष्टीचा राग येऊ लागला. याच रागातून मी तिची हत्या केली. आरोपीने हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.