Coronavirus : Success in preventing the spread of corona in several prisons, including Arthur Road | Coronavirus : आर्थर रोडसह अनेक कारागृहात कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश

Coronavirus : आर्थर रोडसह अनेक कारागृहात कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश

ठळक मुद्देलोकमत प्रतिनिधीने त्यांना यावेळी गाठले असता ते म्हणाले, नागपूरच नव्हे तर राज्यातील कोणत्याही कारागृहात कोरोनाचा फैलाव होणार नाही आणि परिस्थीती हाताबाहेर जाणार नाही, यासाठी कसोशिचे प्रयत्न केले जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य कारागृह प्रशासनाने कंबर कसली असून विविध उपायययोजनांसोबतच राज्यातील २७ जिल्ह्यात ३७  तात्पुरते कारागृह उभारल्याचेही  रामानंद म्हणाले.

नरेश डोंगरे 


नागपूर : आॅर्थर रोड जेलसह अनेक ठिकाणी कोरोनाने शिरकाव केला. मात्र, फैलाव रोखण्यात आम्ही यश मिळवले आहे. राज्यातील कोणत्याही कारागृहातील परिस्थीती हाताबाहेर जाऊ देणार नाही, असा विश्वास राज्य कारागृह प्रशासनाचे प्रमूख (सुधार व सेवा) अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी व्यक्त केला.

एक नवे कोरोना हॉटस्पॉट म्हणून नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे नाव अधोरेखित झाल्याने नागपूरच नव्हे तर राज्य कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.  मुख्य मध्यवर्ती कारागृह आणि दोन तात्पुरते असे तीन कारागृह तसेच त्यातील कैदी सांभाळण्याची अभूतपूर्व परिस्थिती नागपूर कारागृह प्रशासनावर आली असताना मध्यवर्ती कारागृहातील ४१ कैदी आणि ५६ अधिकारी कर्मचा-यांना कोरानाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे येथील कैदीच नव्हे तर अधिकारी, कर्मचारीही धास्तावले आहेत. अनेक अधिकारी-कर्मचारी होम क्वॉरेन्टाईन करण्यात आले आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाचा कारभार डळमळीत झाल्याची स्थिती आहे. ते लक्षात आल्यामुळे अतिरिक्त पोलीस महासंचालक रामानंद यांनी नागपूर कारागृहाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

लोकमत प्रतिनिधीने त्यांना यावेळी गाठले असता ते म्हणाले, नागपूरच नव्हे तर राज्यातील कोणत्याही कारागृहात कोरोनाचा फैलाव होणार नाही आणि परिस्थीती हाताबाहेर जाणार नाही, यासाठी कसोशिचे प्रयत्न केले जात आहे. आम्ही प्रतिबंधात्मक उपायययोजना करीत आहोत आणि शासनाकडून आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा मिळत आहेत. त्याचमुळे मुंबईतील आॅर्थर रोड कारागृह असो की औरंगाबाद, कोरोनाचा फैलाव आणि त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण रोखण्यात आम्हाला यश आल्याचे ते म्हणाले. राज्यातील विविध कारागृहात ४११ कैदी आणि १६२  कारागृह अधिकारी कर्मचा-यांना कोरोनाचा संसर्ग झाला. कैद्यांची मृत्यूसंख्या चार असली तरी प्रत्यक्षात दोनच आहे. दोघांना विविध व्याधीमुळे मृत्यू झाल्याचेही ते म्हणाले. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य कारागृह प्रशासनाने कंबर कसली असून विविध उपायययोजनांसोबतच राज्यातील २७ जिल्ह्यात ३७  तात्पुरते कारागृह उभारल्याचेही  रामानंद म्हणाले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

 

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

Web Title: Coronavirus : Success in preventing the spread of corona in several prisons, including Arthur Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.