शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
3
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
4
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
5
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
6
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
7
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
8
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
9
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
10
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
11
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
12
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
13
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
14
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
15
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
16
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
17
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
18
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
19
Monsoon 2026 Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : दिलासादायक! उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीजवळ तैनात १७० सुरक्षा रक्षकांचे अहवाल निगेटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 20:12 IST

Coronavirus : शहरातील १५ पोलीस वसाहतींवर विशेष लक्ष

ठळक मुद्दे नियमानुसार सर्व होम क्वारंटाईन, परिसरातील चहावाल्याला झाला होता कोरोना दिलासादायक म्हणजे या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.सोमवारी हे वृत्तसमोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरु झाली.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात एका चहावाल्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तेथे तैनात १७० पोलीस सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. दिलासादायक म्हणजे या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. या सर्व पोलिसांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या वांद्रे येथील मातोश्रीबाहेरील चहावाल्याला करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. सोमवारी हे वृत्तसमोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरु झाली. चहावाला राहत असलेल्या इमारतीमधील चार जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलेलं होते. मातोश्री परिसरात तैनात काही पोलीस सुरक्षारक्षक या चहावाल्याकडे चहा प्यायचे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तेथे तैनात १७० पोलीस अधिका-यांची व कर्मचा-यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले. मात्र, नियमानुसार या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

मुंबईतील तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना सतर्कतेचे आदेश देण्याता आले आहेत. यावेळी पोलीस वसाहतींकडे लक्ष देण्यात येत आहे. शहरातील १५ पोलीस वसाहतींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. यातील 8 वसाहती या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आहेत आणि ५5 वसाहती या पोलीस अधिका-यांच्या आहेत. यापैकी २ वसाहती पूर्ण सील केल्या आहेत. या १५ वसाहतींमध्ये एक दिवसाआड वैद्यकीय पथक जाऊन येथील अधिकारी - कर्मचा-यांच्या कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या