प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिवशक्ती सचदेवचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. नुकताच तिने कुटुंबासह नवीन घरात प्रवेश केला. घराच्या वास्तुशांतीचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत ज्यात ती भावुक झालेली दिसत आहे. शिवशक्ती गेल्या काही वर्षांपासून हिंदी टीव्ही क्षेत्रात काम करत आहे. 'सबकी लाडली बेबो','अफसर बिटिया','दिया और बाती हम' अशा मालिकांमुळे ती घराघरात पोहोचली. तर आता शिवशक्ती अधिकृतरित्या मुंबईकर झाली आहे.
शिवशक्ती सचदेवने इन्स्टाग्रामवर गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत, निळ्या रंगाची डिझाइनर साडी, ग्लोई मेकअप या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे. कुटुंबातील सदस्य आणि मित्रमैत्रिणींसोबत तिने अनेक फोटो पोस्ट केले आहेत. प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर मोठा आनंद दिसत आहे. शिवशक्तीने 'शुक्र' असं घराचं नाव ठेवलं आहे जे खूपच खास आहे. ती लिहिते, "एक स्वप्न...माझंच नाही तर माझ्या आईबाबाचंही..आपल्या मुलीचं मुंबईत स्वत:चं घर असावं. आज तेच स्वप्न सत्यात उतरलं आहे आणि मला अजूनही विश्वास बसत नाहीये. देवाची माझ्यावर सदैव विशेष कृपा राहिली आहे असं मला नेहमीच वाटतं. मला न समजणाऱ्या अनेक मार्गांनी त्याने नेहमीच माझं रक्षण केलं आणि मला मार्गदर्शन केलं. म्हणूनच आम्ही आमच्या घराचं नाव ठेवलंय — 'शुक्र'. कारण आज माझ्या मनात कृतज्ञता आणि आभार मानण्याची भावना सर्वात जास्त आहे. 🤍
मुंबईसारख्या शहरात स्वतःचं हक्काचं घर असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हे फक्त चार भिंती किंवा एखादी सुंदर जागा नाही, तर ही अनेक वर्षांची प्रार्थना, त्याग, अपार कष्ट आणि अखेर पूर्ण झालेलं एक स्वप्न आहे. तुमच्याकडे आज जे काही आहे आणि जे भविष्यात मिळणार आहे, त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहा... कारण देवाने तुमच्यासाठी किती सुंदर योजना आखल्या आहेत हे तुम्हाला ठाऊक नसतं. कधीकधी अगदी शांतपणे आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि अचानक एक दिवस तुम्ही अशा स्वप्नात उभे असता, ज्यासाठी तुम्ही कधीतरी मनापासून प्रार्थना केलेली असते.
हे माझं घर आहे, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. माझं हक्काचं घर! अशी जागा जिने आज माझं मन तृप्त केलंय. आयुष्यात आलेल्या प्रत्येक अनुभवाबद्दल - मग तो चांगला असो, कठीण असो वा भावनिक - मी आज मनापासून ऋणी आहे. कारण या सर्व अनुभवांनीच मला आज मी जे आहे, तसं घडवलंय. आणि खरं सांगू तर, मला स्वतःचा खूप अभिमान वाटतोय. बस, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या. कोणाची नजर न लागो!"
शिवशक्तीच्या या फोटोंवर टीव्ही कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. शिवशक्ती 'द सूट लाइफ ऑफ करण अँड कबीर' मधील राणी ओबेरॉय भूमिकेमुळे लोकप्रिय झाली. त्याने तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं. सध्या की कंटेंट क्रिएटर म्हणूनही लोकप्रिय आहे.
Web Summary : TV actress Shivshakti Sachdev fulfilled her dream of owning a Mumbai home. She shared heartwarming photos of the housewarming ceremony, expressing gratitude and joy. She named the house 'Shukra', acknowledging blessings received. She is known for roles in 'Sabki Laadli Beboo' and 'Diya Aur Baati Hum'.
Web Summary : टीवी अभिनेत्री शिवशक्ति सचदेव ने मुंबई में अपना घर खरीदने का सपना पूरा किया। उन्होंने गृहप्रवेश समारोह की तस्वीरें साझा कीं, जिसमें उन्होंने खुशी और कृतज्ञता व्यक्त की। उन्होंने अपने घर का नाम 'शुक्र' रखा और अपनी कृतज्ञता व्यक्त की। वह 'सबकी लाडली बेबो' और 'दीया और बाती हम' में अपनी भूमिकाओं के लिए जानी जाती हैं।