शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
4
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
5
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
6
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
7
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
8
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
9
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
10
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
11
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
13
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
14
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
15
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
16
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
17
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
18
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
19
Mumbai Murder: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
20
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
Daily Top 2Weekly Top 5

NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 12:09 IST

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा! दिनेश बिवालने १० लाखांत पेपर खरेदी केला पण मुलाला फक्त १०७ गुण मिळाले.

'नीट-युजी २०२६' पेपरफुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे, यासाठी एका वडिलांनी चक्क १० लाख रुपये मोजून पेपर खरेदी केला. मात्र, इतका मोठा जुगाड करूनही मुलाची बुद्धिमत्ता फिकी पडली. ७२० गुणांच्या या परीक्षेत १० लाख खर्चूनही संबंधित विद्यार्थ्याला केवळ १०७ गुण मिळवता आले आहेत. सीबीआयच्या चौकशीत या नेटवर्कचा पर्दाफाश झाला असून गुन्ह्याचे धागेदोरे राजस्थानच्या सीकरपासून ते हरियाणाच्या गुरुग्रामपर्यंत पसरले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

सीबीआयने या प्रकरणी दिनेश बिवाल याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान दिनेशने कबुली दिली की, त्याने आपला मुलगा ऋषी याच्यासाठी १० लाख रुपयांचा व्यवहार करून लीक झालेला प्रश्नपत्र संच मिळवला होता. परीक्षेपूर्वीच प्रश्न हाती आल्याने मुलाला ६०० पेक्षा जास्त गुण मिळतील, अशी खात्री बापाला होती. पण निकाल आला तेव्हा बापाचे डोळेच पांढरे झाले; कारण मुलाला ७२० पैकी केवळ १०७ गुणच मिळाले होते.

सीकरमधील फ्लॅट बनला 'वॉर रूम'

तपासातून समोर आले आहे की, आरोपी दिनेश बिवालने राजस्थानमधील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या सीकरमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. याच फ्लॅटमध्ये त्याचा मुलगा राहायचा. सीबीआयला संशय आहे की, याच फ्लॅटचा वापर करून इतर अनेक संशयित उमेदवारांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात आल्या. सीकर हे देशातील मोठे कोचिंग हब असल्याने, या रॅकेटचे धागेदोरे मोठ्या कोचिंग क्लासेसपर्यंत आहेत का, याचा तपास आता सीबीआय करत आहे.

टेलिग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर डील

तपास यंत्रणांच्या हाती आरोपींच्या चॅट्स लागल्या आहेत. नाशिकच्या एका शुभम नावाच्या व्यक्तीने गुरुग्रामच्या यश यादवशी संपर्क साधला होता. "५००-६०० प्रश्न देतो, त्यातील १५० जरी मूळ परीक्षेत आले तर १० लाख रुपये द्यावे लागतील," अशी ही डील होती. २९ एप्रिल २०२६ रोजी टेलिग्रामवर पीडीएफ स्वरूपात हे प्रश्न पाठवण्यात आले होते. सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे आणि कोरे चेकही गहाण ठेवण्यात आले होते.

नातेवाईकांनाही वाटल्या खिरापतीसारख्या प्रश्नपत्रिका

हा केवळ एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित मामला नव्हता. आरोपी मंगीलालने हा कथित लीक झालेला पेपर आपला मुलगा अमन, नातेवाईक ऋषी आणि गुंजन यांच्यासह अनेक मित्र-मंडळींनाही वाटला होता. इतकेच नाही तर काही शिक्षकांपर्यंतही या प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात आल्या होत्या. सीबीआयने आतापर्यंत ५ जणांना ७ दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे.

पुराव्यांची नष्टाचर्या आणि आयफोनचे गूढ

या प्रकरणातील मुख्य दुवा मानल्या जाणाऱ्या यश यादवने आपल्या आयफोनमधील महत्त्वाचा डेटा आणि चॅट्स डिलीट केल्याचे समोर आले आहे. मात्र, सीबीआयने हा फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला असून डिलीट झालेला डेटा रिकव्हर केल्यानंतर आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NEET Scam: Father buys paper for son, he still fails!

Web Summary : NEET 2026 paper leak reveals a father spent ₹10 lakhs for his son, who scored only 107 out of 720. The CBI investigation spans from Sikar to Gurugram, exposing widespread cheating involving Telegram, WhatsApp, and multiple individuals, including teachers. Key evidence was deleted from an iPhone.
टॅग्स :NEET Exam Paper Leakनीट परीक्षा पेपर लीकNEET Examनीट परीक्षाexamपरीक्षा