Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 12:43 IST

'रिच डॅड पुअर डॅड' या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा सावध केलं आहे. पाहा काय म्हणाले कियोसाकी.

'रिच डॅड पुअर डॅड' या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा सावध केलं आहे. वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, तर "महागाई आणि कर्ज लोकांची संपत्ती हळूहळू नष्ट करेल, असं स्पष्ट विधान त्यांनी केलंय.

कियोसाकी यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या मते, जग अशा एका टप्प्यावर जात आहे जिथे रोख पैशांद्वारे खरेदी क्षमता सतत कमकुवत होत जाईल. युद्ध, तेलाच्या वाढत्या किमती आणि देशांवरील वाढते राष्ट्रीय कर्ज यांमुळे लोकांच्या बचतीवर मोठा परिणाम होऊ शकतो.

चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर

कियोसाकी यांनी सांगितलेली २ प्रमुख कारणं :

१. इराण युद्ध आणि कच्च्या तेलाचा भडका: मध्य-पूर्व आशियातील तणाव वाढल्यास आणि कच्चं तेल महाग झाल्यास जगभरात महागाईचा उद्रेक होईल. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसेल, कारण त्यांचं उत्पन्न तेवढंच राहील मात्र खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतील.

२. सरकारी कर्ज आणि पैसा: जगातील अनेक देश सातत्यानं स्वतःवरील कर्ज वाढवत आहेत. अशा स्थितीत सरकारं अधिक पैसा छापू शकतात, ज्यामुळे चलनाचं मूल्य कमी होईल. म्हणूनच लोकांनी स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं आणि पैशांचं रक्षण करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी?

कियोसाकी हे नेहमीच रियल असेट्सचं समर्थन करत आले आहेत. यावेळीही त्यांनी गुंतवणूकदारांना सोनं, चांदी, बिटकॉइन आणि इथरियम सारख्या पर्यायांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.

गरीब विरुद्ध श्रीमंत मानसिकता

"मी हे खरेदी करू शकत नाही," असा विचार करणे ही गरीब मानसिकतेची लक्षणं असल्याचं त्यांनी म्हटलंय. याऐवजी "मी हे कसे खरेदी करू शकेन?" असा योग्य प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे, असंही ते म्हणाले.

२०२६-२७ मध्ये 'महामंदी'चा धोका!

यापूर्वीही कियोसाकी यांनी २०२६-२७ या काळात जागतिक बाजारपेठेत ऐतिहासिक घसरण होण्याची भीती व्यक्त केली होती. ही घसरण १९३० च्या 'ग्रेट डिप्रेशन' सारखी असू शकते. वाढतं कर्ज, पैशांची अतिरिक्त छपाई आणि जागतिक इक्विटी बाजारातील अनिश्चितता ही यामागची मुख्य कारणं आहेत, असं त्यांनी नमूद केलं होतं. कियोसाकी यांच्या मते, या संभाव्य घसरणीला घाबरून न जाता गुंतवणूकदारांनी याकडे संपत्ती निर्माण करण्याची मोठी संधी म्हणून पाहिले पाहिजे.

"१९८७, २०००, २००८, २०१५, २०११ आणि २०२२ च्या मंदीच्या काळात मी गरीब झालो नाही, तर उलट अधिक श्रीमंत झालो. २०२६-२७ च्या संभाव्य क्रॅशमध्येही अधिक श्रीमंत होण्याचाच माझा प्लॅन आहे. जेव्हा मंदी किंवा महामंदी येते, तेव्हा चांगल्या मालमत्ता स्वस्त दरात मिळतात. त्या स्वस्तात खरेदी करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. त्यामुळे या संकटात अडकण्याऐवजी त्याचा फायदा घ्यायला शिका," असंही कियोसाकी म्हणतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Kiyosaki warns of inflation, debt eroding wealth; advises real assets.

Web Summary : Robert Kiyosaki cautions investors about inflation and debt destroying wealth. He advocates for investments in gold, silver, Bitcoin, and Ethereum. Kiyosaki anticipates a major market downturn around 2026-27, similar to the Great Depression, presenting opportunities to acquire assets cheaply.
टॅग्स :अर्थव्यवस्थाशेअर बाजारगुंतवणूक