शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

वर्चस्वावरून गुंडांच्या दोन गटात वाद, लुटमार, तोडफोडीमुळे पाचपावलीत दहशतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 7:27 PM

रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या घटनाक्रमामुळे पाचपावलीच्या लष्करीबाग परिसरात प्रचंड तणाव आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देलष्करीबागेतील कुराडकरपेठ भागात गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वर्चस्वाचा वाद सुरू आहे.या घटनाक्रमामुळे कुराडकरपेठेत प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळाल्यानंतर पाचपावली आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील ताफा तिकडे धावला.

नागपूर - गुंडाच्या दोन टोळ्यातील वर्चस्वाच्या वादातून एका टोळीने प्रतिस्पर्धी गुंडाच्या घरावर हल्ला करून त्याला मारहाण केली. रक्कम लुटली आणि परिसरात वाहनांची तोडफोड करत प्रचंड दहशत निर्माण केली. रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या घटनाक्रमामुळे पाचपावलीच्या लष्करीबाग परिसरात प्रचंड तणाव आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लष्करीबागेतील कुराडकरपेठ भागात गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वर्चस्वाचा वाद सुरू आहे. एकमेकांवर हल्ले करणे, मारहाण करणे असे प्रकारही घडतात. या पार्श्वभूमीवर, रविवारी मध्यरात्री सौरभ वासनिक आणि त्याच्या टोळीतील १५ ते २० गुंडांनी तलवार, चाकू, लोखंडी पाईप, काठ्या घेऊन मनोज वासनिकच्या घरावर हल्ला केला. त्याच्या दरवाजाला तलवारीने छिद्र पाडून तोडले. नंतर त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या जवळचे अडीच हजार रुपये लुटले. त्यानंतर परिसरात आरडाओरड करत या गुंडांनी हैदोस घातला. त्यांनी वाहनांची तोडफोड सुरू केली. रस्त्यात दिसेल त्याला मारहाण करून ते धमकावत होते.

या घटनाक्रमामुळे कुराडकरपेठेत प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळाल्यानंतर पाचपावली आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील ताफा तिकडे धावला. तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. पोलिसांनी रात्रभर धावपळ करून सोमवारी दुपारी सौरभ वासनिकसह पाच गुंडांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू होती. या घटनेमुळे सोमवारी सकाळपासून लष्करीबाग परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर