शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
5
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
6
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
7
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
8
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
9
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
10
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
11
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
12
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
13
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
14
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
15
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
16
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
17
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
19
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
20
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 17:02 IST

या ट्विटमध्ये तिने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी केल्याचा आरोप करत आदित्य सरफरे या सामान्य मुंबईकराने ही तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर तिने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्न केल्याने भारतीय दंड विधान कलम 499 ,1PC500 आणि 124A  लावण्यात यावे, अशा तक्रारदाराने विनंती केली आहे. 

मुंबई - सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासोबतच मुंबईत सध्या कंगना राणौतचा वाद चिघळत चालला आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राविरोधात बदनामीकारक ट्वीट करणं अभिनेत्री कंगना राणौतला भॊवणार असल्याचं दिसत आहे. कंगनाविरोधात गोरेगाव वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगनाने जाणीवपूर्वक टीका करणारे ट्वीट केले. या ट्विटमध्ये तिने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी केल्याचा आरोप करत आदित्य सरफरे या सामान्य मुंबईकराने ही तक्रार दाखल केली आहे.कंगनाच्या ट्वीटमुळे महाराष्ट्र सरकारच्या अस्मितेला धक्का पोचला आहे. संपूर्ण देशाला आदर असलेल्या मुंबई पोलिसांना हिणवले असून एक भारतीय नागरिक आणि एक सामान्य मुबईकर या नात्यान मला पटणारे नाही. मुंबईला पीओके असे म्हणून तिने संबंध महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटल आहे. ९ सप्टेंबरला मी मुंबईत येत असून, कोण मला रोखतं ते बघू असे खुले आव्हान तिने महाराष्ट्र सरकारला दिले आहे. त्यामुळे आता राज्याचा आणि मुंबई पोलिसाच्या प्रतिष्ठचा मुद्दा बनला असल्याचंही तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले आहे. त्यविरोधात आदित्य सरफरे यांनी शनिवरी मुंबई अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर गोरेगावच्या वनराई पोलिस ठाण्यात तक्रारीची प्रत पाठविण्यात आली. आता कंगना विरोधात दोन दिवसात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर तिने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्न केल्याने भारतीय दंड विधान कलम 499 ,1PC500 आणि 124A  लावण्यात यावे, अशा तक्रारदाराने विनंती केली आहे. 

 

काय म्हणाले संजय राऊत?कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु, तिने मुंबईचा उल्लेख मिनी पाकिस्तान केला आहे. तिच्यात हिंमत असेल तर जे मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी कंगनाबद्दल एक आक्षेपार्ह शब्द वापरला.काय आहे प्रकरण?अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.कंगनाचे थोबाड फोडण्याचा इशाराकंगना राणौतला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगना राणौतवर निशाणा साधला होता.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर

 

मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

 

फ़ुटबॉलपटूविरोधात खळबळजनक आरोप, मुंबईतील तरुणीने केली बलात्काराचा तक्रार

 

 

 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतPoliceपोलिसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रTwitterट्विटरSanjay Rautसंजय राऊत