शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 11:11 IST

महाराष्ट्रातील धुळे येथे एका पतीने आपल्या जुन्या प्रेयसीच्या प्रेमासाठी पत्नीला विष देऊन ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

धुळे जिल्ह्यातील पश्चिम देवपूर परिसरातून एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. १० मे रोजी ३८ वर्षीय शारदा उर्फ पूजा बागुल या विवाहित महिलेचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. पोलीस तपासात हे प्रकरण केवळ अपघाती नसून, सुनियोजित खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी तिचा पती कपिल बाळू बागुल असून, तो भारतीय लष्करात लिपिक पदावर कार्यरत आहे.

प्रेमसंबंधातून खून

प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, कपिलचे कॉलेजमधील मैत्रीण प्रज्ञा महेश कर्दळे हिच्याशी पुनः संबंध निर्माण झाल्यानंतर त्याने आपल्या पत्नीच्या मृत्यूचा कट रचला. पोलिसांनी कपिलसह त्याची आई विजया बागुल, वहिनी रंजना बागुल आणि प्रज्ञा कर्दळे यांना अटक केली आहे. प्रज्ञा यांचा घटस्फोट अंतिम टप्प्यात असून, तिला दोन मुली आहेत.

विषप्रयोगानंतर उपचाराऐवजी अंत्यसंस्काराची तयारी

पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषप्रयोगामुळे पूजाच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि तिची तब्येत झपाट्याने खालावली. जवळपास दीड तासांनी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच आरोपी पतीने अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती.

याचदरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी धुळे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. रिपोर्टमध्ये विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाचा तपास हत्या दिशेने वळवण्यात आला.

आधीपासूनच दिला जात होता कौटुंबिक त्रास 

पूजाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, तिला अनेक वर्षांपासून सासरच्या लोकांकडून मानसिक त्रास दिला जात होता. या संदर्भात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पूजाच्या नातेवाईकांनी दावा केला की, आयोगाने वेळीच ठोस पावले उचलली असती, तर तिचा जीव वाचू शकला असता.

पुढील तपास सुरू

देवपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी हत्या, कटकारस्थान आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे