शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरमध्ये १४ वर्षांच्या मुलीचा बालविवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 22:17 IST

हे लग्न गुपचूप लावून देण्यात आल्याचे समोर

ठळक मुद्देवडील व आत्याला अटक

पुणे : बालविवाहाला बंदी असतानाही पिंपरी चिंचवड भागातील मद्यपी वडिल आणि आत्याने १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़. मुलीच्या मावशीने हा प्रकार उघडकीस आणत हडपसरपोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. वडील, आत्या, भटजी व सांगली येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ वडिल व आत्याला पोलिसांनी अटक केली आहे़. याप्रकरणी मावळ तालुक्यातील सोमाटणे येथील २४ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसह तळेगाव परिसरात राहण्यास आहे. तिच्या वडिलांना दारुचे व्यसन आहे़ ते मिळेल  कामधंदा करतात. दरम्यान, मुलीची आत्या हडपसर परिसरात राहण्यास आहे.  वडील आणि आत्यांनी संगनमत करून सांगली येथील वयाने मोठा असणाऱ्या एका मुलाशी विवाह करून विवाह लावून दिला. त्यानंतर काही दिवसांनीच तिचे लग्न तिच्या वडील आणि आत्याने बळजबरीने लावून दिल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली.त्यानंतर त्यांनी याची माहिती घेतली. त्यावेळी हे लग्न गुपचूप लावून देण्यात आल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी तळेगाव पोलीसांकडे तक्रार दिली. तळेगाव पोलिसांनी याची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर यातील आरोपींवर गुन्हा दाखल करून हा प्रकार हडपसर भागात घडल्याने तपासासाठी हडपसर पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे.या मुलीचे नातेवाईक हडपसर परिसरात राहण्यास आहेत. त्यामुळे या मुलीच्या लग्न कार्याची सुरूवात हडपसरमध्ये झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे हडपसर पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला आहे. दरम्यान, आरोपी सांगलीत असल्याची माहिती मिळाल्याने हडपसर पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधासाठी गेल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, वडिल आणि आत्याने केवळ वयाने १४ वर्षाच्या मुलीचे लग्न इतक्या घाईत का लावून दिले, याचा तपास पोलीस करत आहेत. 

टॅग्स :HadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिस