चिकन नाही बनवले म्हणून प्रेयसीचा गळा आवळून केली हत्या, कुटुंबात हळहळ 

By पूनम अपराज | Updated: November 16, 2020 19:56 IST2020-11-16T19:55:39+5:302020-11-16T19:56:13+5:30

Murder : रविवारी पहाटे हा खुनाचा गुन्हा उघड झाला आहे. आरोपी फरार आहे, आरोपीविरूद्ध महिलेच्या अल्पवयीन  मुलाने गुन्हा दाखल केला आहे.

The chicken was not made so the girlfriend was strangled to death, stirring up the family | चिकन नाही बनवले म्हणून प्रेयसीचा गळा आवळून केली हत्या, कुटुंबात हळहळ 

चिकन नाही बनवले म्हणून प्रेयसीचा गळा आवळून केली हत्या, कुटुंबात हळहळ 

ठळक मुद्देशनिवारी रात्री शबानाची 14 वर्षांची मुलगी झोपली होती. रविवारी पहाटे शबानाचा मृतदेह पलंगावर पडलेला आढळला.

मेरठच्या लिसाडी गावात दिवाळीच्या रात्री एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केला. रविवारी पहाटे हा खुनाचा गुन्हा उघड झाला आहे. आरोपी फरार आहे, आरोपीविरूद्ध महिलेच्या अल्पवयीन  मुलाने गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबाना (45) पाच मुलांसह लिसाडी खेड्यातील नूर नगर हॉल्ट जवळील घरात राहत होती. याच घरात नूरदीन भाड्याने राहत होता. खुशहाल नगर येथील हा नागरिक होता. तस्लीम हा शबानाला पती होता. त्याचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले. शबाना आणि नूरदीन यांचे अवैध संबंध होते. नूरदीन काही महिन्यांपूर्वी शबानाला या घरात घेऊन आला होता. शनिवारी रात्री शबानाची 14 वर्षांची मुलगी झोपली होती. रविवारी पहाटे शबानाचा मृतदेह पलंगावर पडलेला आढळला.

 

हत्येची माहिती मिळताच पोलीस अधिकारी अरविंद चौरसिया फॉरेन्सिक टीमसमवेत दाखल झाले. शबानाचा मृतदेह सापडला. पोलिसाने शबानाच्या 17 वर्षाचा मुलगा आणि अल्पवयीन मुलीकडे चौकशी केली. त्याचवेळी, नूरदीन हा मारेकरी फरार होता. पोलिसांनी नूरदीनचा भाऊ शहाबुद्दीन याला ताब्यात घेतले आहे. शबानाचा मुलगा शाहनवाजने नूरदीनविरूद्ध लिसाडीगेट पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, तपासणीत असे दिसून आले आहे नूरदीन आपल्या घरात कमी आणि शबानाच्या घरात अधिक राहत होता. शनिवारी रात्री नुरदीन कोंबडी घेऊन आला होता. परंतु शबानाने चिकन बनविण्यास नकार दिला. या प्रकरणावर त्यांच्यात वाद झाला. या वादामुळे शबानाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे समजत आहे.

मात्र, शबानाच्या मुलाने सांगितले की, घरातून दोन लाख रुपये आणि दागिने गायब आहेत. परंतु त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे हे प्रकरण संशयास्पद दिसते. या हत्येमध्ये घरातील सदस्याच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे. असे सांगितले जात आहे की, ताबीजांचा जाड धागा गळा दाबला गेला. चौकशीनंतर उघड होईल. अशी माहिती अमर उजालाने दिली आहे. 

Web Title: The chicken was not made so the girlfriend was strangled to death, stirring up the family