चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 22:28 IST2025-11-24T22:27:55+5:302025-11-24T22:28:44+5:30

याप्रकरणी शहर पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. दिलीप दादाजी मडावी (५३) असे अटकेतील नराधम शिक्षकाचे नाव आहे.

Chandrapur shaken again Minor girl raped, brutal teacher arrested | चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक

चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक

चंद्रपूर : नाशिकमधील मालेगाव येथे तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना गाजत असतानाच चंद्रपुरातही एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. दिलीप दादाजी मडावी (५३) असे अटकेतील नराधम शिक्षकाचे नाव आहे.

पीडित मुलगी राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत मागील पाच वर्षांपूर्वी इयत्ता सहावीत शिकत होती. शिक्षकसुद्धा तिथेच कार्यरत होता. पीडित मुलगी हुशार असल्याने तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च प्राथमिक शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठवण्याचा सल्ला मडावीने तिच्या आई-वडिलांना दिला. त्यामुळे मागील वर्षी ती मुलगी चंद्रपूर येथे शिक्षणासाठी आली. दरम्यान, त्या मुलीचे आई-वडील काही आवश्यक साहित्य त्या शिक्षकाकडे पाठवायचे. तेव्हा शिक्षक तिच्या रुमखाली जाऊन त्या मुलीला घरगुती सामान देण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत बसवून तिचे शोषण करायचा. मात्र, बदनामीच्या भीतीने त्या मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. २० तारखेला ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय तृप्ती खंडाईत यांनी पीडित मुलीचे बयान घेत शिक्षक दिलीप मडावी याच्यावर बीएनएस (७५ (१), ६४ (२), आयएमएफ ६५ १, ३५२, ४, ६, १२ पॉक्सो ६६ (ई) ६७ (ए) आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके करत आहेत.

...असे आले प्रकरण उघडकीस -
नराधम शिक्षक पीडित मुलीला रात्री बाथरुममध्ये जाऊन विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल करायला सांगायचा. या कॉलचे त्याने स्क्रिनशॉटसुद्धा काढले होते. २० नोव्हेंबर २०२५ रोजी चुकीने हा स्क्रिनशॉट व चॅटिंग पीडित मुलीच्या वडिलांच्या मोबाइलवर जाताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी मुलीला याबाबत विचारणा केली, तिने आपबिती कथन केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

घुग्घुस केंद्रातही तक्रार -
दिलीप मडावी याची मागील काही दिवसांपूर्वी घुग्घुस केंद्रातील एका शाळेत बदली झाली. येथेही त्याने मुलींना बॅडटच केल्याच्या तक्रारी पालकांकडे गेल्या. त्यांनी शाळा गाठून त्या शिक्षकाला चांगलेच धारेवर धरले. पोलिस ठाण्यापर्यंतही विषय गेला होता. मात्र, तक्रार झाली नसल्याची माहिती आहे. शेवटी पालकांनी त्या शिक्षकाची बदली करण्याची मागणी केली.

Web Title : चंद्रपुर फिर दहला: नाबालिग लड़की से दुष्कर्म, शिक्षक गिरफ्तार

Web Summary : चंद्रपुर: एक नाबालिग लड़की के साथ यौन उत्पीड़न के आरोप में एक शिक्षक को गिरफ्तार किया गया। आरोपी दिलीप मडावी ने शिक्षा में मदद करने के बहाने पूर्व छात्रा का शोषण किया। परिवार को आपत्तिजनक स्क्रीनशॉट मिलने के बाद उस पर पोक्सो एक्ट के तहत आरोप लगाए गए हैं।

Web Title : Chandrapur Shaken Again: Minor Girl Assaulted, Teacher Arrested

Web Summary : Chandrapur: A teacher was arrested for sexually assaulting a minor girl. The accused, Dilip Madavi, exploited the girl, a former student, under the guise of helping her with her education. He has been charged under the POCSO Act after the family discovered incriminating screenshots.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.