Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:38 IST2025-10-07T17:35:38+5:302025-10-07T17:38:14+5:30
Chaitanyananda Saraswati : चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
स्वयंघोषित बाबा चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. याने अनेक मुलींचा छळ केला आहे. मुलींना अश्लील मेसेज पाठवले आहेत. तपासात असं दिसून आलं आहे की, चैतन्यनंद वारंवार मुलींना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवत असत आणि अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होता.
पीडित मुलींचं स्वयंघोषित बाबाच्या महिला ब्रिगेड कमांडर (डीन) सोबतचं संभाषण आता समोर आलं आहे. ऑडिओ रेकॉर्डिंगनुसार, महिला ब्रिगेड कमांडर (डीन) मुलींना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाण्यासाठी सांगायची. बाबाने त्यांच्यासाठी एक आलिशान रुम बूक केली आहे. त्या तिथे त्याच्यासोबत डिनर करावा लागेल आणि नंतर हॉटेलमध्येच रात्र घालवावी लागेल असं सांगत आहे.
अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
डीन मुलींना त्यांचे कपडे सोबत आणण्यास सांगते, परंतु मुली नकार देतात. एक विद्यार्थिनी तिला मासिक पाळी आल्याचं सांगते. त्यावर डीनने "फालतू कारणं देऊ नको. तुला कमी मार्क मिळालेत म्हणून बाबा तुला ओरडतील असं वाटत आहे. यापासून वाचण्यासाठी खोट बोलत आहेस. जर तुम्ही येण्यास नकार दिला तर तुमच्या राहण्याची सोय दुसरीकडे करावी लागेल" असं म्हटलं आहे.
चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
बाबाचा एका मोठ्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. विद्यार्थिनींनी स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे समोर आणले. तो मुलींना खूप त्रास देत होता. लैंगिक संबंधांसाठी दबाव आणत असे आणि त्यांना धमकावत असे. ३५ हून अधिक मुलींचा त्याने छळ केला. चैतन्यनंदला सेक्स टॉय आणि अश्लील सीडी नेमक्या कोणी पुरवल्या आणि मठात खरोखरच एक मोठं रॅकेट कार्यरत होतं का? याचा तपास पोलीस आता करत आहेत.