शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणे वरिष्ठांच्याही अंगलट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 15:46 IST

भांडुपचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांची बदली

ठळक मुद्देचौकशी पूर्ण होताच खाडे यांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागात बदलीचे आदेश बुधवारी काढण्यात आले.त्यांच्या जागेवर शाम शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यांच्यावरही भांडुपमध्ये एकामागोमाग वाढणारे गुन्हे व त्याविरुद्ध भांडुपकरानी उठवलेल्या आवाजामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

मुंबई - पोलीस ठाण्यात आरोपीचा वाढदिवस साजरा करणे प्रकरण वरिष्ठांच्याही अंगलट आले आहे़ भांडुप पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांसह तीन अंमलदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर आता पोलीस ठाण्यातील कारभारावर नियंत्रण ठेवण्यात असमर्थ ठरलेल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांची संरक्षण आणि सुरक्षा विभागात बुधवारी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर शाम शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे.गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात भांडुप पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांची सशस्त्र पोलीस दलात उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्यावरही भांडुपमध्ये एकामागोमाग वाढणारे गुन्हे व त्याविरुद्ध भांडुपकरानी उठवलेल्या आवाजामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सोनापूरमधील तरुणाचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करतानाचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आणि पोलीस दलात एकच खळबळ उडाली. याविरुद्ध ही भांडुपकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. याविरुद्ध उपायुक्त अखिलेश सिंह यांनी विभागीय चौकशी सुरु केली. उपनिरीक्षक पंकज शेवाळे आणि सचिन कोकरे यांच्यासह तीन अंमलदारांचे निलंबन करत त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नाईट पीआयसह भांडुप पोलीस ठाण्याचे वपोनि रमेश खाडे यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली. चौकशी पूर्ण होताच खाडे यांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागात बदलीचे आदेश बुधवारी काढण्यात आले.

‘या’ वरिष्ठ निरीक्षकाचीही बदली

खाडे यांच्या बदलीसोबतच बुधवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वपोनि संजीव घाडगे यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त जागेवर विशेष शाखेतील मृत्यूंजय हिरेमठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि संतोष बागवे यांची विशेष शाखेत तर, त्यांच्या रिक्त जागी पूर्व नियंत्रण कक्षात नियुक्तीस असलेल्या शालीनी शर्मा यांची नेमणूक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील वपोनि राजेश काळे यांच्यावर अंधेरी पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीTransferबदलीMumbaiमुंबई