शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

वाहनचोरांची होतेय मजा; मुंबईकर भोगताहेत सजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 05:37 IST

दहा महिन्याला अडीच हजार वाहने चोरीला

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : वाहन चोरांमुळे मुंबईकरांची डोकेदुखी कायम असल्याचे चित्र मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहेत.  जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत मुंबईतून दाेन हजार ५९८ वाहने चोरीला गेल्याची नोंद पोलिस दफ्तरी करण्यात आली आहे. तर अन्य चोरीचे १३,६८१ गुन्हे दाखल आहेत. यापैकी अवघे १,२९३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. सोनसाखळी चोरांना पोलिसांनी वेसण घातली असली तरी मोटार वाहन चोरी, जबरी चोऱ्या, दिवसा- रात्रीच्या घरफोड्या अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात पोलिसांना यश आले नसल्याचे दिसत आहे.

त्यातही वाहन चोरीच्या गुन्ह्यात एकाच चावीने दार उघडता येईल आणि इंजिनही सुरू होईल (सिंगल की सिस्टीम) अशा कार चोरांसाठी सहज लक्ष्य ठरतात. हे ओळखून वाहननिर्मिती कंपन्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. डिजिटल की, बोटाचा ठसा ओळखून प्रतिसाद देणारी यंत्रणा बसविली.  यातल्या बहुतांश उपाययोजनांचे संरक्षक कडे भेदून वाहन चोऱ्या होत आहेत.

...तर बनावट चावीने कार चोरणे अशक्य१ फॉर्च्युनर कारला डिजिटल ‘की’ आहे. चावी आणि इंजिन एका बार कोडने बांधलेले असतात. त्यामुळे बनावट चावी तयार करून कार चोरणे निव्वळ अशक्य असते. २ अशा परिस्थितीत बार कोड ओळखून इंजिन सुरू करणाऱ्या ईसीएम यंत्रावरच चोरांच्या टोळ्या हल्ला करतात. हे यंत्र काढतात. स्वत:कडील ईसीएम यंत्र बसवून वाहन चोरतात. ३ एखाद्या वाहनाचा बार कोड काय हे लांबून ओळखू शकेल, अशी परदेशी उपकरणे (ऑटो की प्रोग्रामर) चोरांच्या टोळीकडे आहेत. त्यामुळे ते दोन मिनिटांत अद्ययावत यंत्रणा मोडून अशा महागड्या कार चोरू शकतात.  

असा होतो व्यवहार....n वापरलेल्या पण सुस्थितीतील वाहनांना मागणी आहे. अशा वाहनांची मागणी आली की ती विक्रेत्यांकडून चोरांपर्यंत येते. n ठराविक रंग, साल आणि मॉडेल कुठे मिळेल याचा शोध घेणारे, तिथल्या तिथे चावी बनवणारे, त्याआधारे गाडी चोरणारे, ती सुरक्षित ठिकाणी दोन दिवस दडवून ठेवणारे आणि त्यानंतर मजल- दरमजल करत विक्रेत्यापर्यंत पोहोचवणारे वेगळे अशा साखळीत वाहनचोरी होते. n कार पाच लाखांची असो वा ५० लाखांची चोराला २५ ते ३० हजार रुपयांत मिळते, अशीही माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :theftचोरी