शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मुंबईत भरधाव कारने ८ जणांना चिरडलं; ४ जण मृत्यू तर चौघे जखमी, मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 9:49 AM

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रॉफर्ड मार्केट येथील जनता हॉटेलसमोर रात्री ९ वाजता एका वेगवान कारने ८ जणांना धडक दिली.

मुंबई – शहरातील पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वेगवान कारने ८ जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून इतर चौघांवर नजीकच्या जे.जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात जनता हॉटेलच्या परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रॉफर्ड मार्केट येथील जनता हॉटेलसमोर रात्री ९ वाजता एका वेगवान कारने ८ जणांना धडक दिली. अतिशय गर्दीच्या व मार्केट परिसरामध्ये कोणतेही वाहन भरधाव वेगाने चालवल्यास पादचारी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही आरोपीने मारुती सुझुकी ईस्टीम या वाहनाने भरधाव वेगात येऊन ८ जणांना धडक दिली. यातील ३ महिला आणि एका पुरुषाचा अपघातात मृत्यू झाला तर इतर ४ जणांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी याबाबत पोलिसांना माहिती देताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. घटनास्थळावरुन कारचा चालक फरार झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. यापूर्वीही मुंबईत अशाप्रकारे भरधाव वेगाने येऊन अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा कारचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

मुंबईत यापूर्वी झालेल्या अपघाताच्या घटना

  • २८ सप्टेंबर २००२ साली वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळ सलमान खानच्या लँड क्रूजर गाडीने फूटपाथवर झोपलेल्या ५ जणांना चिरडले होते, त्यात एकाचा बळी गेला तर इतर काही जण जखमी झाले. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती.
  • २०१२ मध्ये पार्टी करुन मित्रांसोबत परतताना दारुच्या नशेत बेफाम गाडी चालवून फुटपाथवरील ७ जणांचा ऍलिस्टर परेरा याने बळी घेतला होता. याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन मुंबई हायकोर्टाने त्याला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर परेराने सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्याठिकाणीही कोर्टाने परेरा याला फटकारत मुंबई हायकोर्टाचा निकालावर शिक्कामोर्तब केले.  
  • ९ जून २०१५ रोजी कॉर्पोरेट वकील तरुणी जान्हवी गडकर हिने दारूच्या नशेत फ्री वेवर समोरून येणाऱ्या एका टॅक्सीला धडक दिली होती. या अपघातात टॅक्सीचालकासह दोघे जागीच ठार झाले, तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी १० जूनला पहाटे जान्हवीला गजाआड केले होते. हा तिचा पहिला अपघात नव्हता. याआधीही तिने अपघात केले होते.

 

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात