चालत्या वाहनात नको ते चाळे, दुभाजकाला आदळली कार; अर्धनग्न महिलेसह २ युवक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 13:51 IST2024-07-29T13:49:35+5:302024-07-29T13:51:11+5:30

नशेच्या अवस्थेत कार दुभाजकाला आदळून ३ जणांसह ४ मुलं जखमी, पोलिसांनी नोंदवला गुन्हा 

Car accident in Kanpur, 2 youths along with a woman were found semi-naked | चालत्या वाहनात नको ते चाळे, दुभाजकाला आदळली कार; अर्धनग्न महिलेसह २ युवक...

चालत्या वाहनात नको ते चाळे, दुभाजकाला आदळली कार; अर्धनग्न महिलेसह २ युवक...

कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूर इथं एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री एक वेगवान कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला आदळली. त्यानंतर स्थानिक लोक तातडीने अपघातग्रस्त कारमधील प्रवाशांच्या मदतीला पोहचले मात्र त्यांच्या डोळ्यासमोर जे दृश्य दिसले त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. कारमध्ये अर्धनग्न अवस्थेत एक महिला नशेत असणाऱ्या २ युवकांसोबत प्रवास करत होती. इतकेच नाही तर कारमध्ये ४ लहान मुलेही होती. 

अपघातग्रस्त कारमध्ये दारुच्या बाटल्या आणि काही आक्षेपार्ह साहित्यही होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी युवकांना ताब्यात घेतले. कानपूरच्या जाजमऊ येथील जेके चौकात ही घटना घडली. पोलिसांनी युवकांना ताब्यात घेऊन महिला आणि ४ मुलांना रुग्णालयात दाखल केले आहे. २ युवकांच्या मेडिकल चाचणीनंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तर महिलेला तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहे.

माहितीनुसार, दोन युवक महिलेसोबत कारमध्ये बसून दारु पित होते. त्यावेळी कार अनियंत्रित होत रस्त्यावरील दुभाजकाला आदळली. ही कार इतक्या वेगात होती त्यामुळे दुभाजकाला झालेली टक्कर त्यातून आलेल्या आवाजामुळे स्थानिकांमध्ये भीती पसरली. कारला पाहून आसपासचे लोक मदतीसाठी धावले. तेव्हा कारमध्ये अर्धनग्न अवस्थेत महिलेसह २ युवक दिसले. या कारमध्ये ४ मुलेही होती. मात्र हे तिघे अर्धनग्न अवस्थेत दारुच्या नशेत होते. अपघातामुळे ते गंभीर जखमी झाले. 

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहचताच महिलेसह २ युवकांना आधी कपडे परिधान केले. त्यानंतर हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले. २ युवकांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी करत आहेत. अद्याप महिला काही बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने ती पूर्णपणे बरी झाल्यानंतर चौकशी करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Car accident in Kanpur, 2 youths along with a woman were found semi-naked

टॅग्स :Accidentअपघात