२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 10:22 IST2025-09-27T10:21:56+5:302025-09-27T10:22:48+5:30
मास्क घातलेले २५ सशस्त्र दरोडेखोर सॅन रेमनमधील हेलर ज्वेलर्समध्ये घुसले आणि त्यांनी १ मिलियनपेक्षा जास्त (जवळपास ९ कोटी रुपये) किमतीचे हिरे, दागिने आणि सोनं लुटलं.

२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईलमध्ये दरोडा पडला. मास्क घातलेले २५ सशस्त्र दरोडेखोर सॅन रेमनमधील हेलर ज्वेलर्समध्ये घुसले आणि त्यांनी १ मिलियनपेक्षा जास्त (जवळपास ९ कोटी रुपये) किमतीचे हिरे, दागिने आणि सोनं लुटलं. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे.
संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये हातोडा, बॅग आणि बंदुका घेऊन दरोडेखोर दुकानात प्रवेश करताना स्पष्ट दिसत आहेत. त्यांनी काचेची कपाटं फोडली आणि मौल्यवान दागिने चोरले. अचानक घडलेल्या या घटनेने उपस्थित असलेले लोक खूप घाबरले.
🇺🇲🥷25 robbers entered a California jewelry store and stole $1 million worth of merchandise.💰
— Tibo91 (@Tibortibor15) September 25, 2025
The gang arrived in six cars. The thieves brandished guns,furiously smashing display cases and stuffing jewelry into backpacks. pic.twitter.com/dhbTxzqfaG
न्यू यॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, सॅन रेमन पोलीस विभागाचे लेफ्टनंट माइक पिस्टेलो म्हणाले की, दरोडेखोर दुकानात प्रवेश करताच दरवाजा आपोआप लॉक झाला. २०२३ मध्ये झालेल्या दरोड्यानंतर हे सुरक्षा फीचर लावण्यात आलं होतं. त्यांनी आत प्रवेश केल्यानंतर दुकान पूर्णपणे ताब्यात घेतले आणि सर्व दागिने चोरले.
दरवाजा बंद होता, ज्यामुळे ते काही काळ आत अडकले. त्यांनी बाहेर पडण्यासाठी गोळीबार केला आणि दुकानाचा दरवाजा तोडण्यात यशस्वी झाले. पार्किंगमध्ये आधीच सहा वाहनं उभी होती, ज्याच्या मदतीने सर्व दरोडेखोर पळून गेले. ड्रोन फुटेजमध्ये ते गाड्यांमध्ये पळून जाताना दिसत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. एका अल्पवयीन मुलासह सात संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी पळून जाण्यासाठी वापरलेली वाहनं देखील जप्त केली आहेत.