Crime News Latest: शाळेत गेलेली दोन्ही मुले घरीच परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांना आणि नातेवाईकांनी शोधशोध केली. पोलिसांना तक्रार दिली. शोध घेतला जात असतानाच दोन मुलांचे थेट मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेने खळबळ उडाली. जोधपूर जिल्ह्यातील बोरानाडा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. तपासातून जी माहिती समोर आली, तिने सगळ्यांनाच धक्का बसला. या दोन्ही मुलांची हत्या त्यांच्या वडिलांचा बिझनेस पार्टनर असलेल्या व्यक्तीनेच केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हत्या करण्यात आलेल्या मुलाचे वय ८ वर्ष आहे, तर मुलीचे वय १२ वर्ष आहे. पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणी एक सुसाईड नोटही सापडली आहे, जी हत्या करणाऱ्या व्यक्तीची असलेल्या सांगण्यात आले.
दोन मुलांची का केली हत्या?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुले शाळेत गेले होते. ती परत आलीच नाही. कुटुंबीयांना आणि जवळच्या लोकांनी सगळीकडे शोध घेतला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवत पोलीस शोध घेतला.
ज्या व्यक्तीने हत्या केल्याचा आरोप आहे, त्याचे नाव श्याम सिंह भाटी (वय ७०) असे आहे. त्याचा आणि मयत मुलाच्या वडिलांचा भागीदारीमध्ये बांगड्या बनवण्याचा कारखाना आहे. त्यात मोठे नुकसान झाले. त्यातून आरोपीने दोन्ही मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे.
९ महिन्यांपूर्वी सुरू केला होता कारखाना
पोलीस उपायुक्त वेस्ट राजर्षि यांनी सांगितले की, 'आज (२६ जानेवारी) सकाळी दोन मुलांचे मृतदेह आढळून आले. प्राथमिक तपासातून हे समोर आले आहे की, आरोपी श्याम सिंह भाटी याने ९ महिन्यांपूर्वी त्याच्या पहिल्या भागीदारासोबत बांगड्या बनवण्याचा कारखाना सुरू केला होता.'
'यात त्याचा भागीदार कारागीर म्हणून काम करतो होता. पण, तो नंतर भागीदारीतून बाहेर पडला. त्यामुळे व्यवसायात मोठं नुकसान झालं. त्यामुळे भाटीला राग आला. बदला घेण्याच्या भावनेतून त्याने दोन्ही मुलांची हत्या केली आणि भाड्याने घेतलेल्या खोलीत दोन्ही मुलांचे मृतदेह लटकावले. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली. यात त्याने दोन्ही मुलांची हत्या केल्याची कबूली दिली आहे. सध्या पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत', अशी माहिती राजर्षि यांनी दिली.