शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

प्रियकराने मित्रांसोबत मिळून केली महिला रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या, आणि नंतर फ्लॅटमध्ये मिळाला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 10:45 PM

Crime News: बिहारमधील छपरा येथे महिला रेल्वे कर्मचाऱ्याच्या हत्याकांडामध्ये एक सनसनाटी गौप्यस्फोट झाला आहे. या महिला रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या अवैध संबंधांमधून झाली होती.

पाटणा - बिहारमधील छपरा येथे महिला रेल्वे कर्मचाऱ्याच्या हत्याकांडामध्ये एक सनसनाटी गौप्यस्फोट झाला आहे. या महिला रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या अवैध संबंधांमधून झाली होती. या प्रकरणी एका डाटा ऑपरेटरला अटक करत सोनपूर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. सोनपूरच्या रेल्वे मायक्रोवेव्ह कॉलनी स्थित क्वार्टरमध्ये १८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा महिला रेल्वे कर्मचारी सुनिता देवी हिची हत्या करण्यात आली होती. (The boyfriend along with friends murdered the female railway employee, and later found the body in the flat)

२० सप्टेंबर रोजी पोलिसांनी तिचा मृतदेह जप्त केला होता. मृत सुनैना देवी येथे रेल्वे रनिंग रूममध्ये सहाय्यक आचारी या पदावर कार्यरत होती. एएसपी अंजनी कुमार यांनी सांगितले की, सदर महिला रेल्वे कर्मचाऱ्याची सुनियोजित कारस्थान आखून हत्या करण्यात आली. या हत्याकांडामध्ये चार तरुणांचा सहभाग होता. हत्याकांडामध्ये अटक करण्यात आलेला धीरज कुमार उर्फ सुमित कुमार उर्फ चुन्नू  हा रेल्वेमध्ये डाटा ऑपरेटरचे काम करतो. मृत महिलेसोब अनैतिक संबंध होते. 

मृत सुनैना हिने त्याला वॅगन-आर कार खरेदी करून दिली होती. तसेच ती त्याला सतत पैसेसुद्धा देत असे. गेल्या १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा पूजेसाठी तिने कारची मागणी केली होती. तसेच दिलेले पैसेही परत मागितले होते. धीरज त्यावेळी बनारसला गेला होता. तिथे जाऊन त्याने फोन बंद केला होता. १८ तारखेला तो मित्रांसह आला. त्यानंतर त्याने सदर महिलेच्या क्वार्टरमध्ये जात उशीच्या मदतीने तिचा गळा आवळला. तसेच तिच्या डोक्यावर वजनदार वस्तूने वार करून तिची हत्या केली. या गुन्ह्यात त्याला मित्रांनी मदत केली. दरम्यान, त्याच्याकडून महिलेची चेन पोलिसांनी हस्तगत केली आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच धीरजने गुन्हा कबूल करून इतर आरोपींबाबतही माहिती दिली. त्यांना शोधण्यासाठी पोलीस आता छापेमारी करत आहेत.

मृत महिला सुनैना देवी हिचे सासर वैशाली जिल्ह्यामधील गावात होते. ती दिवंगत रेल्वे कर्मचारी कृष्णनंदन सिंह यांची पत्नी होती. पतीच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर तिला रेल्वेत नोकरी लागली होती. ती पुढच्या वर्षी निवृत्त होणार होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार