रात्री शौचास गेलेल्या मुलीचा सकाळी मदरश्यात सापडला मृतदेह; बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 19:09 IST2021-10-31T19:08:24+5:302021-10-31T19:09:04+5:30
Rape And Murder : मुलीसोबत दुष्कृत्य केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

रात्री शौचास गेलेल्या मुलीचा सकाळी मदरश्यात सापडला मृतदेह; बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय
बिहारमधील बेतियामधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी उशिरा एका बेपत्ता मुलीचा मृतदेह मदरशामध्ये सापडला आहे. मुलीसोबत दुष्कृत्य केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शिकारपूर पोलीस ठाणे हद्दीत घोबहा इस्लामिया मदरसामध्ये १६ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. त्यामुळे पश्चिम चंपारणमधील नरकटियागंजमध्ये या घटनेमुळे लोकांना धक्काच बसला. मुलगी रात्री १० वाजता शौचास गेली त्यानंतर बेपत्ता होती. तिचा शोध घेतला जात होता. मात्र रात्रभर ती सापडली नाही.
तपासादरम्यान मुलीचा मृतदेह मदरसा इस्लामिया घोबहा टोलाच्या क्लास रुममध्ये आढळून आला. मुलीवर बलात्कार केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि दुष्कृत्य केल्यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मदरशामधून मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोहोतल्यानंतर कुटुंबीयांनी मुलीची ओळख पटवली. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. नरकटियागंज डीएसपी कुंदन कुमार, शिकारपूर पोलीस ठाणे अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे.