शरीराचे झाले दोन तुकडे; रेल्वे रुळावर झोपून तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 21:03 IST2021-02-28T21:02:37+5:302021-02-28T21:03:08+5:30
Suicide Case : असोदा रेल्वे गेट येथे रेल्वे रुळावर शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुणाने आत्महत्या केल्याबाबत माहिती रेल्वे स्टेशन मास्तरकडून शनीपेठ पोलिसांना मिळाली.

शरीराचे झाले दोन तुकडे; रेल्वे रुळावर झोपून तरुणाची आत्महत्या
जळगाव : असोदा रेल्वेगेट परिसरात एका अनोळखी २५ वर्षीय तरुणाने रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहे. त्याच्याखिशात फोटो, पाकीट व रुमाल आढळून आला आहे, मात्र नाव व पत्ता याबाबत काहीच माहिती नसल्याने तरुणाची ओळख पटू शकलेली नाही.
असोदा रेल्वे गेट येथे रेल्वे रुळावर शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुणाने आत्महत्या केल्याबाबत माहिती रेल्वे स्टेशन मास्तरकडून शनीपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, अमलदार प्रमोद पाटील व अमित बाविस्कर यांनी घटनास्थळ गाठले असता खांब क्र.४२१/२१ ते ४२१/२० या दरम्यान रुळावर शरीराचे दोन तुकडे झालेले आढळून आले. तुकड्यांच्या बाजुला चप्पल होती तर खिशात रुमाल व पाकीट होते. त्यात फोटो होते. घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलिसांनी दोन्ही तुकडे जिल्हा रुग्णालयात आणले. फोटो व चप्पलवरुन पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख पटविण्याचे आवाहन केले, मात्र रात्री उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती.याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.