रेल्वेमार्ग उडविण्यासाठी घडविला स्फोट, दहशतवादी ठार; खलिस्तानवादी मॉड्यूलशी संबंधित चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:03 IST2026-04-29T11:03:27+5:302026-04-29T11:03:57+5:30

गेल्या तीन महिन्यांत मालवाहतूक कॉरिडॉरवर झालेला हा दुसरा स्फोट आहे. या  प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले

Blast to blow up railway track, terrorist killed; Four arrested for belonging to Khalistan module | रेल्वेमार्ग उडविण्यासाठी घडविला स्फोट, दहशतवादी ठार; खलिस्तानवादी मॉड्यूलशी संबंधित चौघांना अटक

रेल्वेमार्ग उडविण्यासाठी घडविला स्फोट, दहशतवादी ठार; खलिस्तानवादी मॉड्यूलशी संबंधित चौघांना अटक

चंडीगड - पंजाबमधील पतियाळा येथील शंभू परिसरात मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणारा रेल्वेमार्ग उडवून देण्याच्या हेतूने खलिस्तानवादी दहशतवाद्याने स्फोट घडवून आणला; पण त्यात तो स्वत:च मरण पावला आहे. तर या कटातील चार जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शंभू-अंबाला रेल्वेमार्गावर सोमवारी रात्री झालेला स्फोट कमी तीव्रतेचा असल्याचे पोलिसांनी प्रारंभी सांगितले होते. मात्र, तिथे मोठा स्फोट घडविण्याचा प्रयत्न होता असे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बोथोनिया गावाजवळ मालवाहतूक रेल्वेमार्गावर झालेल्या स्फोटामुळे रेल्वे रुळांखाली एक मोठा खड्डा पडला आहे व या मार्गाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या तीन महिन्यांत मालवाहतूक कॉरिडॉरवर झालेला हा दुसरा स्फोट आहे. या  प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोट झाला तेथे पोलिसांना एक अनोळखी मृतदेह सापडला. 

लोको पायलटला आला घातपाताचा संशय
रेल्वेच्या विशेष पोलिस महासंचालक शशी प्रभा द्विवेदी यांनी सांगितले की, स्फोटाच्या वेळी मालगाडी जात असताना लोको पायलटला काहीतरी संशयास्पद जाणवले आणि त्याने तत्काळ संबंधित यंत्रणेला इशारा दिला. शंभू परिसरात रेल्वे मार्गावर सीसीटीव्ही बसविलेले नाहीत. तिथे ठरावीक अंतराने कॅमेरे बसवण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

परदीपसिंग खालसा हा मॉड्यूलचा मुख्य सूत्रधार
परदीपसिंग खालसा हा स्फोट घडविणाऱ्या मॉड्यूलचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले असून, त्याचे मलेशियातील खलिस्तानी सूत्रधारांशी जवळचे संबंध होते. तो कट्टरतावादी युवकांना दहशतवादी प्रशिक्षणासाठी मलेशियात पाठवत होता आणि त्यांना घातपाती कृत्ये करण्याचे आदेश देत होता. तसेच तो ‘चलदा वहीर चक्रवर्ती, अटारीये’ नावाची संघटना चालवत होता, असे पोलिसांनी सांगितले. 

Web Title : रेलवे ट्रैक उड़ाने में खालिस्तानी आतंकवादी की मौत; चार गिरफ्तार

Web Summary : पटियाला के पास रेलवे ट्रैक उड़ाने की कोशिश में एक खालिस्तानी आतंकवादी की मौत हो गई। मॉड्यूल से जुड़े चार लोग गिरफ्तार। विस्फोट से ट्रैक क्षतिग्रस्त, तोड़फोड़ का संदेह। जांच जारी, राष्ट्रीय एजेंसियों की भागीदारी संभव।

Web Title : Khalistani Terrorist Dies in Railway Blast; Four Arrested

Web Summary : A Khalistani terrorist died detonating a railway track near Patiala. Four linked to the module have been arrested. The blast damaged the tracks, raising suspicions of sabotage. Investigations are underway, potentially involving national agencies.