शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
4
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
5
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
6
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
7
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
8
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
9
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
10
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
11
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
12
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
13
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
14
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
15
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
16
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
17
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
18
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
19
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
20
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:13 IST

अघोरी पूजेच्या नावाखाली लुटालूट; मुंबई, नवी मुंबईतील नवनवीन कारनामे उघड  

नवी मुंबई - भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात भोंदूगिरीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशातच मुंबई, नवी मुंबईत भोंदूंचे नवे कारनामे समोर आले. त्यात अंतर्वस्तरांवरून गंडा घालणाऱ्यासह अघोरी पूजेच्या नावाखाली लुटणाऱ्यांचा समावेश आहे. 

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने गल्ली बोळात भोंदूगिरी वाढली आहे. नोकरी, प्रेमातली बाधा हटवण्यासह जीवनातल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासह अगदी लैंगिक संबंध सुधारून देण्याच्या नावाखाली देखील भोंदू बाबा आपले हातपाय पसरत आहेत. नागरिकांच्या मनात मंत्र तंत्राची भीतीला घर करून देऊन हे कारस्थान रचले जात आहेत. अशाच एका विचित्र प्रकाराचा मुंबई व नवी मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला. अविवाहित असतानाही एका तरुणाला तुझ्या बायकोने तुझ्यावर करणी केल्याची भीती दाखवून थेट त्याच्या अंतर्वस्त्रापर्यंत हा बाबा पोहचला होता. मात्र वेळीच ट्रॉम्बे पोलिस या भोंदूपर्यंत पोहचले आणि संपूर्ण प्रकार उघड झाला. त्याच्याकडे दीडशे ते दोनशे अंतर्वस्त्र मिळून आले आहेत. 

दौलत बाविस्कर उर्फ बंगाली बाबा असे त्याचे नाव असून तो चेंबूरचा आहे. तक्रारदार व्यवसायात येणाऱ्या अपयशामुळे बाबाच्या आहारी गेले. तुझ्यावर बायकोने करणी केली आहे, लैंगिक संबंधात अडचणी आहेत. तुझे अंतर्वस्त्र गायब झाले असून जादूटोणा होत असल्याचे बंगाली बाबाने सांगितले.  अविवाहित असतानाही बाबा सांगत असलेल्या कथेवर त्यांना संशय आल्याने त्यांनी वेळीस सावधान होत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आधार घेत या प्रकरणाला वाचा फोडली. 

गुरू टणटण बाबासह शिष्य जेरबंदसप्टेंबर २०२५ मध्ये या महिलेला एकलहरी बाबा भेटला होता. त्याने या महिलेला तिच्यावर कोणीतरी काळी जादू केली असल्याचे सांगत तिच्या जीविताला धोका असल्याची भीती दाखवली. त्यातून सुटकेसाठी आपले गुरू टणटण बाबा हे अघोरी पूजा करतील असे सांगितले होते. त्यानुसार महिलेनेही त्याच्या थापाला बळी पडून २७ हजर रुपये दिले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्या दोघांनी महिलेच्या घरी येऊन अघोरी पूजा करून ५० हजार रुपये घेतले होते. त्यानंतरही देखील तिच्याकडून अनेकदा ऑनलाईन रक्कम घेण्यात आली होती. 

१ लाख ९० हजार रुपये या महिलेने त्या दोन्ही भोंदू बाबांना दिले होते. मागील काही दिवसांपासून भोंदू अशोक खरात यांच्यानंतर राज्यातील अनेक भोंदू बाबांची प्रकरणे समोर येत आहेत. त्यांच्या बातम्या बघून आपलीही फसवणूक झाल्याची जाणीव महिलेला झाली. यामुळे मंगळवारी रात्री तिने एनआरआय पोलिस ठाणे गाठले असता बुधवारी सकाळी सहायक निरीक्षक सचिन ढगे यांच्या पथकाने दोघांना नाशिकच्या घोटी परिसरातून अटक केली. अर्जुन भरत चव्हाण (२१) व सागर शिवाजी शिंदे (२४) अशी दोघांची नावे आहेत. ते मूळचे जळगावचे असून भोंदू बनून राज्यभर भटकत असायचे. त्यांनी इतरही अनेकांना अशा प्रकारे गंडा घातल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बेलापूरच्या महिलेला १.९० लाखांचा गंडानवी मुंबईत बेलापूरमध्ये राहणारी महिला मात्र दोन भोंदू बाबांच्या आहारी जाऊन १ लाख ९० हजार रुपये गमावून बसली होती. मात्र सध्या राज्यभरात भोंदू बाबांवर होणाऱ्या कारवाया व प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमुळे तिचे डोळे उघडले आणि तिने एनआरआय पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यावरून मंगळवारी गुन्हा दाखल झाला आणि दोघा भोंदूंना बुधवारी नाशिकच्या घोटी मधून अटक करण्यात आली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fake gurus exploit faith; black magic exposed, disciples arrested.

Web Summary : Maharashtra police busted fake gurus exploiting faith, arresting fraudsters involved in black magic and cheating. Victims were swindled out of money with false promises and fear tactics. Several arrests made in Mumbai and Navi Mumbai.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी