श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:13 IST2026-04-30T12:13:30+5:302026-04-30T12:13:58+5:30

अघोरी पूजेच्या नावाखाली लुटालूट; मुंबई, नवी मुंबईतील नवनवीन कारनामे उघड  

'Black game' of impostors taking advantage of faith; Magic, Karni's havoc, Tantan Baba and his disciples arrested | श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद

AI Generated Image

नवी मुंबई - भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात भोंदूगिरीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशातच मुंबई, नवी मुंबईत भोंदूंचे नवे कारनामे समोर आले. त्यात अंतर्वस्तरांवरून गंडा घालणाऱ्यासह अघोरी पूजेच्या नावाखाली लुटणाऱ्यांचा समावेश आहे. 

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने गल्ली बोळात भोंदूगिरी वाढली आहे. नोकरी, प्रेमातली बाधा हटवण्यासह जीवनातल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासह अगदी लैंगिक संबंध सुधारून देण्याच्या नावाखाली देखील भोंदू बाबा आपले हातपाय पसरत आहेत. नागरिकांच्या मनात मंत्र तंत्राची भीतीला घर करून देऊन हे कारस्थान रचले जात आहेत. अशाच एका विचित्र प्रकाराचा मुंबई व नवी मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला. अविवाहित असतानाही एका तरुणाला तुझ्या बायकोने तुझ्यावर करणी केल्याची भीती दाखवून थेट त्याच्या अंतर्वस्त्रापर्यंत हा बाबा पोहचला होता. मात्र वेळीच ट्रॉम्बे पोलिस या भोंदूपर्यंत पोहचले आणि संपूर्ण प्रकार उघड झाला. त्याच्याकडे दीडशे ते दोनशे अंतर्वस्त्र मिळून आले आहेत. 

दौलत बाविस्कर उर्फ बंगाली बाबा असे त्याचे नाव असून तो चेंबूरचा आहे. तक्रारदार व्यवसायात येणाऱ्या अपयशामुळे बाबाच्या आहारी गेले. तुझ्यावर बायकोने करणी केली आहे, लैंगिक संबंधात अडचणी आहेत. तुझे अंतर्वस्त्र गायब झाले असून जादूटोणा होत असल्याचे बंगाली बाबाने सांगितले.  अविवाहित असतानाही बाबा सांगत असलेल्या कथेवर त्यांना संशय आल्याने त्यांनी वेळीस सावधान होत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आधार घेत या प्रकरणाला वाचा फोडली. 

गुरू टणटण बाबासह शिष्य जेरबंद
सप्टेंबर २०२५ मध्ये या महिलेला एकलहरी बाबा भेटला होता. त्याने या महिलेला तिच्यावर कोणीतरी काळी जादू केली असल्याचे सांगत तिच्या जीविताला धोका असल्याची भीती दाखवली. त्यातून सुटकेसाठी आपले गुरू टणटण बाबा हे अघोरी पूजा करतील असे सांगितले होते. त्यानुसार महिलेनेही त्याच्या थापाला बळी पडून २७ हजर रुपये दिले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्या दोघांनी महिलेच्या घरी येऊन अघोरी पूजा करून ५० हजार रुपये घेतले होते. त्यानंतरही देखील तिच्याकडून अनेकदा ऑनलाईन रक्कम घेण्यात आली होती. 

१ लाख ९० हजार रुपये या महिलेने त्या दोन्ही भोंदू बाबांना दिले होते. मागील काही दिवसांपासून भोंदू अशोक खरात यांच्यानंतर राज्यातील अनेक भोंदू बाबांची प्रकरणे समोर येत आहेत. त्यांच्या बातम्या बघून आपलीही फसवणूक झाल्याची जाणीव महिलेला झाली. यामुळे मंगळवारी रात्री तिने एनआरआय पोलिस ठाणे गाठले असता बुधवारी सकाळी सहायक निरीक्षक सचिन ढगे यांच्या पथकाने दोघांना नाशिकच्या घोटी परिसरातून अटक केली. अर्जुन भरत चव्हाण (२१) व सागर शिवाजी शिंदे (२४) अशी दोघांची नावे आहेत. ते मूळचे जळगावचे असून भोंदू बनून राज्यभर भटकत असायचे. त्यांनी इतरही अनेकांना अशा प्रकारे गंडा घातल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बेलापूरच्या महिलेला १.९० लाखांचा गंडा
नवी मुंबईत बेलापूरमध्ये राहणारी महिला मात्र दोन भोंदू बाबांच्या आहारी जाऊन १ लाख ९० हजार रुपये गमावून बसली होती. मात्र सध्या राज्यभरात भोंदू बाबांवर होणाऱ्या कारवाया व प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमुळे तिचे डोळे उघडले आणि तिने एनआरआय पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यावरून मंगळवारी गुन्हा दाखल झाला आणि दोघा भोंदूंना बुधवारी नाशिकच्या घोटी मधून अटक करण्यात आली. 

Web Title : अंधविश्वास का फायदा: ढोंगी बाबा गिरफ्तार, काला जादू उजागर।

Web Summary : महाराष्ट्र पुलिस ने अंधविश्वास का फायदा उठाने वाले ढोंगी बाबाओं का भंडाफोड़ किया, काला जादू और धोखाधड़ी में शामिल धोखेबाजों को गिरफ्तार किया। पीड़ितों को झूठे वादों और डर की रणनीति से ठगा गया। मुंबई और नवी मुंबई में कई गिरफ्तारियां।

Web Title : Fake gurus exploit faith; black magic exposed, disciples arrested.

Web Summary : Maharashtra police busted fake gurus exploiting faith, arresting fraudsters involved in black magic and cheating. Victims were swindled out of money with false promises and fear tactics. Several arrests made in Mumbai and Navi Mumbai.