BJP leader has affair with lady SP worker; The wife looked in the flat and ...pda | भाजपा नेत्याचे सपाच्या महिला पदाधिकाऱ्याशी सूत जुळले; पत्नीने फ्लॅटमध्ये पाहिले अन्...

भाजपा नेत्याचे सपाच्या महिला पदाधिकाऱ्याशी सूत जुळले; पत्नीने फ्लॅटमध्ये पाहिले अन्...

ठळक मुद्देश्रीकांत त्यागी यांना रात्री गोमती नगर स्थित अपार्टमेंटमध्ये मैत्रिणीसोबत पत्नीने रंगेहाथ पकडले.या मारहाणीत दोघींना दुखापत झाली. पोलिसांनी दोघींना पकडून पोलीस ठाण्यात नेले.

लखनौ - लखनौच्या गोमती नगरातल्या भाजपा किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्रीकांत त्यागी यांची पत्नी आणि मैत्रीण यांच्या कपडे फाडेपर्यंत जोरदार मारामारी झाली आणि दोघींनीही एकमेकांविरोधात मारहाण, धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. श्रीकांत त्यागी यांना रात्री गोमती नगर स्थित अपार्टमेंटमध्ये मैत्रिणीसोबत पत्नीने रंगेहाथ पकडले.
 

विश्वासघात केल्याने पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. 'अमरउजाला'ने दिलेल्या बातमीनुसार लखनऊ भाजप किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्रीकांत त्यागी हे गोमती नगर येथील ग्रीनवूड अपार्टमेंटमधील एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. मात्र, त्यांचे कुटुंबीय तेथे राहत नाही. त्यांचे कुटुंबीय हे नोएडा येथे राहतात. गेल्या रविवारी श्रीकांत यांची पत्नी अनू आपल्या दोन मुलांसह ग्रीनवूड अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये पोहोचली. मात्र, येथे आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच अनू यांचा राग अनावर झाला.

अनू जेव्हा फ्लॅटमध्ये पोहोचली तेव्हा एक महिला त्या फ्लॅटमधून बाहेर पडत होती. तिला पाहताच अनू भयंकर चिडली. दोन्ही महिलांमध्ये मोठा वाद सुरू झाला. यावेळी अनूची मुलं तिच्यासोबत होती. या दोघी फक्त भांडण करुन थांबल्या नाहीत तर यादरम्यान दोघींमध्ये मारहाण झाल्याचे  सांगण्यात येत आहे. या मारहाणीत दोघी महिलांचे मोबाइल फोन तुटले. याबाबत अनूने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

या मारहाणीत दोघींना दुखापत झाली. पोलिसांनी दोघींना पकडून पोलीस ठाण्यात नेले. तेथे सुद्धा संपूर्ण रात्र गोंधळ सुरु होता. पोलीस निरीक्षक प्रमेंद्र कुमार सिंह यांनी दोघींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असल्याचं सांगितलं. तसेच एका अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे. तर अपार्टमेंटच्या दुसर्‍या टॉवरमध्ये एनजीओ संचालक आणि सपाच्या पदाधिकारी असलेली महिला राहते. रविवारी रात्री श्रीकांतची बायको अचानक दोन मुलांसह फ्लॅटमध्ये आली असल्याची सिंह यांनी माहिती दिली.श्रीकांत त्यागींच्या पत्नीचे म्हणणे आहे की, त्यांना पतीच्या मैत्रिणीनेमारहाण केली आणि कपडे फाडले आहेत. माझा आरोप आहे की, दोन मुलांना देखील मारहाण करण्यात आली आहे.

Web Title: BJP leader has affair with lady SP worker; The wife looked in the flat and ...pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.