शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
2
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहे अब्दुल्लाहिल अमान आजमी?
3
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
4
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
5
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
6
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
7
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
8
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
9
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
10
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
11
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
12
"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
13
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल
14
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
15
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
16
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
17
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
18
फार्मा क्षेत्रातील दुसरी सर्वात वेगवान वाढणारी कंपनी IPO आणतेय; एका लॉटसाठी किती पैसे लागणार?
19
सावधान! आईस्क्रीम, च्युइंगम, शुगर फ्री प्रोडक्टमुळे लिव्हर खराब; खाण्याआधी एकदा 'हे' वाचाच
Daily Top 2Weekly Top 5

"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 16:20 IST

Bihar Crime: बिहारमध्ये ही धक्कादायक घटना घडली

Bihar Crime: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका जैन मुनींशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. सरैया पोलीस स्टेशन हद्दीतील गोपीनाथपूर डोक्रा येथे एका गुन्हेगाराने दिगंबर जैन मुनी उपासपार्जयी श्रमण श्री विशालसागर जी मुनी महाराज यांच्याशी गैरवर्तन केले. तसेच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. तुम्ही पूर्ण कपडे घालून या अशी धमकीही त्याने दिली. या घटनेमुळे जैन समाज संतप्त झाला आहे.

नेमके काय घडले?

सकाळच्या वेळेत, जैन मुनी त्यांच्या तीर्थयात्रेदरम्यान डोक्रा परिसरातून जात होते. अचानक दुचाकीवरून एक तरुण आला आणि मुनींंशी असभ्य वर्तन करू लागला. त्याने मुनींवर आवाज चढवला आणि ओरडून त्यांना धमकवायला लागला. "तुम्ही कपडे घाला नाहीतर माझे साथीदार तुम्हाला कपडे घालायला लावतील आणि गोळ्या घालतील," अशी धमकी त्यांनी दिली. या वर्तनामुळे जैन मुनी आणि त्यांच्यासोबत असलेले भक्त घाबरले. मुनींनी पुढे जाण्यास नकार दिला आणि राष्ट्रीय महामार्ग-७२२ च्या बाजूला ध्यानस्थ अवस्थेत शांतपणे बसले. हे पाहून त्यांचे अनुयायी संतापले आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांकडून कारवाई

घटनेची माहिती मिळताच, निरीक्षक नादिया नाझ, सरैया पोलीस स्टेशन अधिकारी सुभाष मुखिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचल्या. तथापि पोलिस येण्यापूर्वीच दुचाकीवरील आरोपी पळून गेले. पोलिसांनी सुरक्षा कडे तयार केले आणि जैन मुनींना सुरक्षितपणे सरैया पोलीस स्टेशन परिसरातील सीमेवर नेले. स्टेशन प्रमुखांनी स्पष्ट केले की, त्या खोडसाळ तरुणाने मुनींना कपडे घालण्यास सांगितले होते, त्यानंतर तो तिथेच थांबला. माहिती मिळताच पोलीस लगेच पोहोचले, पण तेव्हा मात्र तो आरोपी आधीच घटनास्थळावरून पळून गेला.

सीतामढीमार्गे मिथिलापूर...

जैन मुनी यापूर्वी वैशाली येथील एका प्राचीन जैन मंदिरात एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते सोमवारी रात्री डोक्रा येथे राहिले होते आणि मंगळवारी सकाळी सीतामढी मार्गे मिथिलापूरला जात होते. घटनेनंतर ते बराच वेळ एका जागी ध्यानस्थ बसले. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून मुनी यांना त्यांच्या बिहारमधील वास्तव्यादरम्यान प्रत्येक ठिकाणी पुरेशी सुरक्षा पोलिस अधिकाऱ्यांनी पुरवावी अशी मागणी समुदायाच्या सदस्यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar: Jain Monk Harassed, Threatened; Community Outraged by Gunda's Behavior

Web Summary : In Bihar, a Jain monk was harassed and threatened by a criminal demanding he wear clothes. The community is outraged. Police are investigating after the monk refused to move and sat in meditation. Security has been increased for the monk's travels.
टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस