शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! ऑनलाईन गेमिंगने घेतला आणखी एक बळी; १४ वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 19:08 IST

ऑनलाईन गेमिंगच्या नादात अडकलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले.

मोबाईलवरील ऑनलाईन गेमिंगचे व्यसन तरुण पिढीसाठी किती घातक ठरू शकते, याचा एक अत्यंत हृदयद्रावक प्रकार मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये समोर आला आहे. ऑनलाईन गेमिंगच्या नादात अडकलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अंश साहू असे या मुलाचे नाव असून, तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आईने मोबाईल वापरण्यावरून रागावल्याचा राग मनात धरून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

नेमकं प्रकरण काय? 

समोर आलेल्या माहितीनुसार, पिपलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम कॉलनीमध्ये अंश साहू आपल्या कुटुंबासह राहत होता. तो आठवीत शिकत होता. अलीकडेच अंशच्या आजोबांचे निधन झाले होते. सोमवारी त्यांच्या तेराव्याचा विधी होता. कुटुंबातील सर्व सदस्य या विधीला गेले होते, मात्र अंश घरीच थांबला होता. दुपारी जेव्हा आई-वडील घरी परतले, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता, आत अंश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

आईच्या खात्यातून २८ हजार रुपये उडाले! 

अंशला ऑनलाईन गेमिंगचे प्रचंड व्यसन जडले होते. तो 'ब्लू व्हेल'सारखे धोकादायक आणि चॅलेंजवर आधारित गेम्स खेळायचा. या व्यसनापायी त्याने आपल्या आईच्या बँक खात्यातून तब्बल २८ हजार रुपये ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर उडवले होते. मुलाचे वागणे बदलल्याचे आणि अभ्यासात लक्ष नसल्याचे पाहून दीड महिन्यापूर्वीच पालकांनी त्याचा मोबाईल काढून घेतला होता.

आई मोबाईलवरून रागावली अन्...  

घटनेच्या दिवशी अंशने आईच्या पर्समधून चोरून मोबाईल काढला आणि पुन्हा गेम खेळण्याचा प्रयत्न केला. हे पाहून आईने त्याला कडक शब्दांत फटकारले. या रागामुळे अंश प्रचंड तणावाखाली होता. आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून त्याने घरातच स्वतःला संपवून घेतले. जेव्हा पालक घरी आले, तेव्हा त्यांना मुलाचा मृतदेह पाहावा लागला. अवघ्या काही तासांत हसत्याखेळत्या घराचे रूपांतर स्मशानशांततेत झाले.

पोलीस तपास सुरू 

पिपलानी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अंशचा मोबाईल जप्त केला आहे. त्याच्याकडे कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. "अंशला मोबाईलचे व्यसन होते, हे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच्या डिजिटल अ‍ॅक्टिव्हिटीची तपासणी केली जात आहे," अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त गौतम सोलंकी यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Online Gaming Claims Another Life: 14-Year-Old Takes Drastic Step

Web Summary : A 14-year-old in Bhopal, addicted to online gaming, tragically ended his life after being scolded for using his mother's phone. He had previously spent 28,000 rupees from her account on games like 'Blue Whale'. Police are investigating his digital activity.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश