Bengaluru Crime: बंगळुरुमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी एक भीषण घटना समोर आली आहे. आयफोन असेंब्ली युनिट असलेल्या प्रसिद्ध फॉक्सकॉन कंपनीच्या कारखान्यात घडली. एका १९ वर्षीय अविवाहित तरुणीने कंपनीच्या स्वच्छतागृहात बाळाला जन्म दिल्यानंतर, धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून हत्या केली. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या या बाळामुळे सामाजिक बदनामी होईल, या भीतीपोटी या तरुणीने हे क्रूर कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी बंगळुरूच्या देवनहल्ली इथल्या फॉक्सकॉन कारखान्यात कर्मचारी म्हणून काम करते. बुधवारी कामावर असताना रेणुका टॉयलेटमध्ये गेली. तिथे तिला अचानक प्रसव कळा सुरू झाल्या आणि तिने बाळाला जन्म दिला.
गळा चिरला अन् कचऱ्याच्या डब्यात फेकले
बाळाचा जन्म झाल्यानंतर क्षणाचाही विचार न करता, रेणुकाने बाळाचा गळा चिरला आणि त्याचा मृतदेह एका काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत भरून टॉयलेटमधील डस्टबिनमध्ये टाकून दिला. हा धक्कादायक प्रकार दुसरी महिला कर्मचारी स्वच्छतागृह वापरण्यासाठी गेली असताना उघडकीस आला. तिथे तिला रक्ताने माखलेली पिशवी आणि नवजात अर्भकाचा मृतदेह आढळला. या घटनेने संपूर्ण कंपनी परिसरात एकच खळबळ उडाली.
तपासात काय आले समोर?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणी अविवाहित होती. लग्नाआधी बाळ झाल्यामुळे समाजात होणारी बदनामी आणि लोक काय म्हणतील, या भीतीपोटी तिने बाळाला संपवण्याचा निर्णय घेतला. बाळाचा जन्म होताच त्याची हत्या करण्यात आली. आरोपी तरुणीची प्रकृती बिघडल्याने तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : A Foxconn employee in Bengaluru gave birth in a toilet and killed the baby, fearing social stigma. Police are investigating.
Web Summary : बेंगलुरु में फॉक्सकॉन कर्मचारी ने सामाजिक बदनामी के डर से शौचालय में बच्चे को जन्म दिया और उसकी हत्या कर दी। पुलिस जांच कर रही है।