शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

कासारवाडीत पेट्रोलंपपावरील कामगारांना मारहाण करत चोरट्यांनी केला ऐवज लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 2:05 PM

कासारवाडी येथे प्रदीप बधे यांच्या मालकीचा साई गौरी पेट्रोलपंप आहे. या पंपावर दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

पिंपरी : कासारवाडीतील पेट्रोलपंपावर कामगारांना दुचाकीवरून आलेल्या तीन आज्ञत चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील रोकड आणि मोबाईल पळवून नेला. ही घटना सोमवारी (दि.१३) सायंकाळी घडली. याप्रकरणी मंगळवारी भोसरी पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथे प्रदीप बधे यांच्या मालकीचा साई गौरी पेट्रोलपंप आहे. या पंपावर दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. पेट्रोलपंप कामगाराकडे पैशांची मागणी केली. त्याने नकार देताच, मारहाण करत त्यांच्याकडील ३३०० रूपयांची रोकड आणि ९०० रुपये किंमतीचा मोबाईल असा मिळुन ४२०० रुपयांचा ऐवज पळवून नेला. औदुंबर इंगळे या कामगाराच्या डोक्यात फायटरने मारले. त्याला गंभीर दुखापत करून चोरटे पळुन गेले. पेट्रोलपंपावर सेल्समन म्हणुन काम करणारे फुलचंद भास्कर जाधव (वय २३) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. भोसरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkasarwadiकासारवाडीPetrol Pumpपेट्रोल पंपCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोर