शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

अबब! ५ वर्षांत रेल्वे अपघातात 18,423 जणांचा मृत्यू तर 18,874 जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 7:03 PM

दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी लोकलमधून पडून, रेल्वे पटरी क्रॉस करताना मृत्युमुखी पडतात. 2013 पासून 2018 ऑगस्टपर्यंत मुंबईत रेल्वे पटरीवरील अपघातात 18,423 लोकांनी आपला जीव गमावले आहे अशी माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे. 

मुंबई - अमृतसरमध्ये रावण दहन रेल्वे पटरीवर उभे राहून पाहणाऱ्या लोकांना ट्रेनने उडवलं. या भीषण अपघात 61 लोकांच्या मृत्यू झाला तर  70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मुंबईची लाइफ लाइन असलेल्या रेल्वे लोकलमधून दररोज एक कोटीपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. या लोकल ट्रेनमध्ये बरीच गर्दी पाहायला मिळते. धावपळीच्या जगात या गर्दीमुळे प्रवाशांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दरवाजावर लटकून तर कधी उभे राहून प्रवास करावा लागतो. यामुळे दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी लोकलमधून पडून, रेल्वे पटरी क्रॉस करताना मृत्युमुखी पडतात. 2013 पासून 2018 ऑगस्टपर्यंत मुंबईत रेल्वे पटरीवरील अपघातात 18,423 लोकांनी आपला जीव गमावले आहे अशी माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे. 

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलीस यांच्याकडे 2013 पासून मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यातून पडून किंवा रेल्वे पटरी क्रॉस करताना किती लोकांच्या मृत्यू आणि  जखमी झाले आहे याची  माहिती मागितली होती. या संदर्भात मुंबई रेल्वे पोलिसांचे जनमाहिती अधिकारी यांनी माहिती पुरवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उपनगरी रेल्वे पटरीवर रेल्वे लोकलमधून पडून  किंवा पटरी क्रॉस करताना 2013 पासून 2018 ऑगस्टपर्यंत एकूण 18423 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच 18847 लोक जखमी झाले आहेत. 

वर्षानुसार किती मृत्यू आणि लोक जखमी :-

2013 - एकूण 3506 लोकांच्या मृत्यू 3318 जखमी 

2014 - एकूण 3423 लोकांच्या मृत्यू 3299 जखमी 

2015 - एकूण 3304 लोकांच्या मृत्यू 3349 जखमी 

2016 - एकूण 3202 लोकांच्या मृत्यू 3363 जखमी 

2017 मध्ये एकूण 3014 लोकांच्या मृत्यू 3345 जखमी 

2018 ऑगस्टपर्यंत एकूण 1974 लोकांच्या मृत्यू 2173 जखमी

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे पटरीच्या दोन्ही बाजू सुरक्षा भिंत बांधण्याच्या आदेश दिले आहे. परंतु रेल्वे प्रशासने याकडे लक्ष दिलेले नाही. अमृतसरसारख्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहात का असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वे बोर्ड अध्यक्ष यांना विचारला आहे.   

 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातcentral railwayमध्य रेल्वे