भाजपच्या माजी आमदाराचा महावितरण कार्यालयात गळफास लावून घेण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 08:29 PM2021-11-23T20:29:39+5:302021-11-23T20:52:01+5:30

Attempt to Suicide : नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांचेमी  शेतीपंपाची वीज जोडणी महावितरण प्रशासनाकडून खंडित करण्यात येत आहे. या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज नेवासे महावितरण कार्यालयात स्वत:ला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला.

Attempt to hang former BJP MLA in Mahavitaran office | भाजपच्या माजी आमदाराचा महावितरण कार्यालयात गळफास लावून घेण्याचा प्रयत्न

भाजपच्या माजी आमदाराचा महावितरण कार्यालयात गळफास लावून घेण्याचा प्रयत्न

googlenewsNext

नेवासा (जि.अहमदनगर)  : महाराष्ट्रात महावितरण प्रशासनाकडून सक्तीची थकीत वीज बिल वसुली मोहीम राबविली जात आहे. या विरोधात भाजपचे नेते आंदोलने करत आहेत. नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांचेमी  शेतीपंपाची वीज जोडणी महावितरण प्रशासनाकडून खंडित करण्यात येत आहे. या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज नेवासे महावितरण कार्यालयात स्वत:ला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महावितरण कार्यालयात एकच गोंधळ उडाला त्यांच्या गळ्याचा फास काढण्यात आला नंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

 वीज बिलांची  सक्तीची वसुली सुरू आहे. या संदर्भात बाळासाहेब मुरकुटे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देऊनही महावितरण अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज मुरकुटे यांनी नेवासे महावितरण कार्यालयामध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुरकुटे यांनी दोरी लावून गळफास घेण्याचा प्रयत्न करताच त्यावेळी त्यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविल्याने अनर्थ टळला.



 वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच वीज प्रश्नाबाबत भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नेवासे भाजपचे पदाधिकारी हे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. मुरकुटे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन केले. नेवासे भाजपचे शिष्टमंडळाने शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये न घेता तीन हजार रुपये भरून घ्यावेत ही मागणी केली होती. मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवल्याने संतप्त झालेल्या मुरकुटे यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयातच शेतकऱ्यांच्या वीज तोड प्रकरणी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी थांबविले. त्यांच्या बरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे ही उपस्थित होते. बाळासाहेब मुरकुटे यांचा श्वास रोखला गेल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Attempt to hang former BJP MLA in Mahavitaran office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.