शहरं
Join us  
Trending Stories
1
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
2
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
3
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
4
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
5
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
6
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
7
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
8
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
9
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
10
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
12
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
13
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
14
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
15
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
16
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
17
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
18
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
19
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
20
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवरील अत्याचार वाढले; लॉकडाऊनमुळे पोलिसांच्या कामात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 23:35 IST

चंदीगढमध्ये चोरीचे प्रमाण घटले

चंदीगढ : कोरोनाची साथ व त्यापायी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे चंदीगढमधील चोरी, खून, लूटमार, फसवणूक या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असून, घरात महिलांवर होणारे अत्याचार, सायबर गुन्ह्यांत वाढ झाली आहे तसेच पोलिसांच्या कामातही थोडासा बदल झाला आहे. ज्या गुन्ह्यांत सात वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे अशा गुन्हेगारांना, विशेषत: जे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झालेल्या भागात राहत आहेत तेथील आरोपींना सध्या अटक करू नका असे आदेश देण्यात आले आहेत.

चंदीगढ पोलिसांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून स्वत:च्या आरोग्याचेही रक्षण करावे अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, खून, लूटमार, सोनसाखळी खेचणे, रस्त्यावरील अपघात अशा गुन्ह्यांचे प्रमाण २४ मार्च ते २० मे या कालावधीत ७० टक्के घटले असून, घरातील महिलांवर होणारे अत्याचार, आत्महत्या, सायबर गुन्हे यांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढले आहे.

चंदीगढमध्ये कोरोना साथीमुळे २३ मार्च रोजी रात्री लागू केलेली संचारबंदी ५ मे रोजी हटविण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनाची साथ येण्यापूर्वी चोर, दरोडेखोरांना पकडणे हे पोलिसांचे मुख्य काम होते. मात्र आता तोंडावर मास्क न घालता घराबाहेर पडणाऱ्यांना पकडणे, लोकांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडणे, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नीट होण्यासाठी मदतीचा हात देणे अशी कामे सध्या पोलीस करत आहेत. 

पोलिसांवर हल्ला करणाºयांना अटक नाही

च्संचारबंदी लागू असताना या शहरातील धानस भागातल्या कच्ची कॉलनी, मणी माजरा येथे पोलिसांवर नागरिकांनी हल्ला करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. हल्लेखोरांची ओळख पटविण्यात आली असली तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेले नाही. शहरात दारु पिऊन गाडी चालविणाºयांकडून दंड वसूल करण्याची कारवाईही सध्या थांबविण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस