Ashok Kharat Case: रिमोटवर चालणारा साप दाखवून भोंदू खरात घाबरवायचा; विवाहितेवर बलात्कारानंतर गर्भपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 21:25 IST2026-03-23T20:52:08+5:302026-03-23T21:25:45+5:30

खरातच्या दुष्कृत्यांचा आणि विकृतीचा आणखी एक पुरावा पुढे आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नरबळी व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

Ashok Kharat Case: Fear of being shown a snake moving on a remote control; Abortion after rape on a married woman | Ashok Kharat Case: रिमोटवर चालणारा साप दाखवून भोंदू खरात घाबरवायचा; विवाहितेवर बलात्कारानंतर गर्भपात

Ashok Kharat Case: रिमोटवर चालणारा साप दाखवून भोंदू खरात घाबरवायचा; विवाहितेवर बलात्कारानंतर गर्भपात

नाशिक - भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता पीडितांच्या तक्रारीत आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपी खरात हा नकली साप व वाघाचे कातडे वापरून लोकांमध्ये भीती निर्माण करत असे. रिमोटवर चालणारा हा साप हालताना दिसल्यावर उपायांसाठी येणाऱ्यांना अदभूत वाटत असे, अशाप्रकारे तो फसवणूक करीत असे. ईशान्येश्वर मंदिराच्या नावाखाली अघोरी कृत्ये करून लोकांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर महिलांना गुंगीकारक पदार्थ देऊन त्यांना वश करून लैंगिक शोषण केले जात असल्याचेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

विवाहानंतरसुद्धा बलात्कार, गर्भपात

यासंदर्भात अन्य एका पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार विकृत अशोक खरात याने तिचा विवाह झाल्यानंतरही वारंवार बळजबरी केली तसेच त्यानंतर गोळ्या देऊन गर्भपातही केल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे. रविवारी ३३ वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात हजर राहून आपल्यावरील आपबिती कथन केली. त्यात तिने धक्कादायक आरोप केले आहेत. त्यानुसार सन २०१३ मध्ये विवाह जुळविण्याच्या काळात तिच्या कुटुंबीयांनी ओळखीच्या व्यक्तींच्या सांगण्यावरून खरातचा सल्ला घेतला होता. यावेळी खरात याने स्वतःला ज्योतिषी व 'अवतारी पुरुष' भासवून संबंधित महिलेचा विश्वास संपादन केला. विवाहानंतरही कौटुंबिक अडचणींवर उपाय सांगण्याच्या नावाखाली तो संपर्कात राहिला. लग्न मोडल्यानंतर दुसरे लग्न करण्यासाठीही खरातने पुन्हा महिलेला बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केला.

खरातच्या दुष्कृत्यांचा आणि विकृतीचा आणखी एक पुरावा पुढे आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नरबळी व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. हा गुन्हा नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले असून, त्यात खरातच्या विकृतीची परिसीमा गाठली गेली आहे. फिर्यादीनुसार, अशोक एकनाथ खरात (६७) याने कॅनडा कॉर्नरच्या ओकस प्रॉपर्टीज कार्यालयात गर्भवती महिलेवर 'पूजा विधी'च्या नावाखाली अमानुष अत्याचार केले. दरम्यान, याप्रकरणात चाकणकर यांना अटक करण्याची मागणी होत आहे. 

एसआयटी तपासाला वेग...

दरम्यान, नवी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात पोलिसांना खरातकडून काही माहिती आवश्यक असल्याने त्याचा ताबा घेण्यासाठी एसआयटी पथकाला पत्र दिले. त्यानंतर दुपारी खरातला क्राइम ब्रँचच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे विशेष तपास पथक अधिक सक्रिय झाले असून, तपास केंद्र अन्यत्र हलविण्यात आले आहे. एसआयटी पथकात नवीन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, विशेषतः महिला अधिकाऱ्यांचा समावेश करून पीडित महिलांशी विश्वासाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 

Web Title : फर्जी सांप, बलात्कार और गर्भपात: अशोक खरात के भयावह खुलासे।

Web Summary : अशोक खरात ने नकली सांपों का इस्तेमाल कर लोगों में डर पैदा किया और उनका शोषण किया। उस पर महिलाओं को नशीला पदार्थ देकर यौन शोषण करने का आरोप है, जिसमें शादी के बाद बलात्कार और जबरन गर्भपात शामिल है। पुलिस ने अंधविश्वास विरोधी कानूनों के तहत आरोप दर्ज किए हैं, एसआईटी आगे की जांच कर रही है।

Web Title : Fake snake, rape, and abortion: Horrors of Ashok Kharat exposed.

Web Summary : Ashok Kharat used fake snakes to instill fear, exploiting people. He allegedly drugged and sexually abused women, including rape after marriage leading to forced abortions. Police filed charges under anti-superstition laws, with SIT investigating further atrocities.