सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:44 IST2026-01-02T17:42:49+5:302026-01-02T17:44:25+5:30
एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडशी तिच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं. त्यामुळे त्याला भरचौकात बेदम मारहाण करून अपमानित करण्यात आलं आहे.

सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
आंध्र प्रदेशातील एलुरु जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडशी तिच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं. त्यामुळे त्याला भरचौकात बेदम मारहाण करून अपमानित करण्यात आलं आहे. साई चंद आणि साई दुर्गा या दोघांचे गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
साई दुर्गाच्या कुटुंबीयांनी या नात्याला स्वीकारण्यास नकार दिला होता. अखेर कुटुंबाचा विरोध झुगारून या कपलने काही दिवसांपूर्वी पोलीस संरक्षणात विवाह केला. या लग्नाला साई चंदचे आई-वडील उपस्थित होते, मात्र साई दुर्गाचे कुटुंबीय अनुपस्थित राहिले. या लग्नाचा राग मनात धरून, साई दुर्गाच्या नातेवाईकांनी लग्नानंतर काही वेळातच साई चंदला गाठलं.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये साई चंदला केसाला धरून फरफटत नेताना दिसत आहेत, विजेच्या खांबाला बांधणं आणि वारंवार कानशिलात लगावत मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, "साई दुर्गाचे आई-वडील या लग्नासाठी तयार नव्हते, कारण साई दुर्गा चांगली नोकरी करत होती, तर साई चंद अजूनही बेरोजगार होता. आम्ही अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. कोणालाही वैयक्तिक किंवा कौटुंबिक तक्रारींचं निवारण करण्यासाठी कायदा हातात घेण्याची परवानगी नाही."