Amit Shah, please do CBI probe of Sushant's Singh Rajput suicide; Demand of Riya Chakraborty | अमित शहा, हात जोडते! सुशांतच्या आत्महत्येचा सीबीआय तपास करा; प्रेयसी रिया चक्रवर्तीची मागणी

अमित शहा, हात जोडते! सुशांतच्या आत्महत्येचा सीबीआय तपास करा; प्रेयसी रिया चक्रवर्तीची मागणी

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. आता सुशांतच्या गर्लफ्रेंडनेही अमित शहांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. (Sushant's Singh Rajput suicide)


सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Girlfriend Riya Chakraborty) हिने गृहमंत्री अमित शहांना दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये रियाने लिहिले आहे की, आदरणीय अमित शहा सर, मी सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आहे. त्याच्या अचानक मृत्यूला एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, न्यायाच्या शोधात मी हा जोडून तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु करावी. रियाच्या या ट्विटला अनेकदा रिट्विट करण्यात येत आहे. यावर रियाने आणखी एक ट्विट केले आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये रिया म्हणते की, मी तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. मला फक्त एवढेच समजायचेय की तो कोणता दबाव होता ज्याने सुशांतला आत्महत्येचे पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त केले. अर्जदार रिया चक्रवर्ती. सत्यमेव जयते अमित शाह सर. असे म्हणत तिने ट्विट संपविले आहे. रियाने ट्विटरवरच शहांकडे अर्ज केला आहे. सुशांतने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलीस चौकशी करत असून अनेक दिग्गज दिग्दर्शक, कलाकारांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री रूपा गांगुली, शेखर सुमन तसेच नेते पप्पू यादव यांनी केली आहे. यादव यांच्या मागणीवर शहांनी मंत्रालयाला पत्र पाठविल्याचेही म्हटले आहे. 
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी

चिनी स्मार्टफोन नकोय? सॅमसंगने स्वस्त Galaxy M01s लाँच केला; जाणून घ्या किंमत

कुठेय लॉकडाऊन; कुठेय मंदी! भारतातल्या सर्वांत महागड्या फ्लॅटची खरेदी; किंमत पाहून हादराल

Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण

बापरे! अवघ्या 10 वर्षांच्या मुलाने बँकेतून 30 सेकंदांत 10 लाख रुपये उडविले; सीसीटीव्ही पाहून पोलीस हादरले

...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा

...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल

English summary :
I’m sushants Singh Rajputs girlfriend Rhea chakraborty,it is now over a month since his sudden demise I have complete faith in the government, however in the interest of justice , I request you with folded hands to initiate a CBI enquiry

Web Title: Amit Shah, please do CBI probe of Sushant's Singh Rajput suicide; Demand of Riya Chakraborty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.