शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
4
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
5
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
6
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
7
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
8
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
9
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
10
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
11
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
12
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
13
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
15
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
16
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
17
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
18
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
19
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
20
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोटच्या मुलीला भोसकणारा मद्यपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:17 IST

तीन दिवसापूर्वी पोटच्या मुलीला भोसकून पळून गेलेला दारुड्या आरोपी अखेर पाचपावली पोलिसांच्या हाती लागला.

ठळक मुद्देतीन दिवसापासून होता फरार : पाचपावली पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन दिवसापूर्वी पोटच्या मुलीला भोसकून पळून गेलेला दारुड्या आरोपी अखेर पाचपावली पोलिसांच्या हाती लागला. दिनेश पांडुरंग बुरडे (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे.पाचपावलीच्या कुºहाडकर पेठेत राहणारा आरोपी दिनेश बुरडे हा अट्टल मद्यपी आहे. तो आधी पेंटींगचे काम करायचा. आता एखादवेळी पेंटींगचे काम करतो पैसे मिळाल्यानंतर दारूत उडवतो आणि घरात नेहमी वाद घालतो. १० फेब्रुवारीला त्याने अशाच प्रकारे दारूच्या नशेत स्वत:च्या भावासोबत वाद घातला. दुसऱ्या दिवशी सकाळी ९.४५ ला पुन्हा तो दारू पिऊन आला आणि पत्नीसोबत भांडू लागला. पत्नीने त्याला रोज रोज दारू पिऊन भांडण करायचे असेल तर यापुढे घरी यायचे नाही, असे बजावले. त्यामुळे आरोपी चिडला आणि त्याने घरातील टीव्ही खाली पटकला. भांडेही इकडे तिकडे फेकू लागला. त्याच्याकडून आदळआपट केली जात असल्याचे पाहून पत्नी वर्षा बुरडेने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता तिला तो मारहाण करू लागला. त्याने चाकूही हातात घेतला. ते पाहून त्याची मुलगी निशा (वय १७) आईच्या बचावासाठी धावली. आरोपीने मुलीच्या पोटात चाकूने भोसकले. तिला गंभीर जखमी करून आरोपी पळून गेला. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी निशाला उपचारासाठी मेयोत दाखल केले. वर्षा बुरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हवलदार अनिरुद्ध मेश्राम यांनी कलम ३२६ भादंवि अन्वये आरोपी दिनेश बुरडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. तीन दिवसांपासून त्याची शोधाशोध केल्यानंतर तो गुरुवारी रात्री पोलिसांच्या हाती लागला. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :ArrestअटकNagpur Policeनागपूर पोलीस