Ahmedabad Crime: सोशल मीडियावरील बनावट प्रोफाईल तयार करुन आणि अंधश्रद्धेचा फायदा घेऊन निष्पाप लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका मोठ्या टोळीला अहमदाबाद पोलिसांनी पकडलं आहे. स्वतःची ओळख किन्नर आध्यात्मिक गुरु अशी सांगून एका तरुणीला न्यूड व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले आणि नंतर तिची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अहमदाबादमधील एका पीडित तरुणीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी इन्स्टाग्रामवर Astrologer Pooja Kinnar Maa नावाच्या अकाऊंटशी संपर्क साधला होता. समोरच्या व्यक्तीने आपण ही समस्या काही विधींद्वारे सोडवू शकतो, असे सांगून तरुणीचा विश्वास जिंकला.
विधीच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचा सापळा
आरोपीने सुरुवातीला तरुणीकडून तिचे फोटो मागवून घेतले आणि ते मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर विधी पूर्ण करण्यासाठी तरुणीला न्यूड व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले आणि त्याचे गुपचूप रेकॉर्डिंग केले. याच व्हिडिओच्या जोरावर आरोपीने तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. भीतीपोटी तरुणीने तब्बल १.४३ लाख रुपये आरोपीला पाठवले. मात्र मागणी वाढतच गेल्याने तिने सायबर क्राईम पोलिसांत धाव घेतली.
राजस्थानमधून एकाला अटक, दोन फरार
अहमदाबाद सायबर क्राईम पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे राजस्थानमधील बिकानेर येथून रजनीश भार्गव याला अटक केली आहे. त्याचे दोन साथीदार विकास भार्गव आणि रवी भार्गव सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हे आरोपी २० ते २५ वयोगटातील असून गेल्या दोन वर्षांपासून हे रॅकेट चालवत होते.
३०० जणांना रोज टार्गेट, ४२ लाखांची लूट
सायबर क्राइम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी दररोज सुमारे ३०० लोकांशी संपर्क साधत असे. आध्यात्मिक गुरु किंवा ज्योतिष असल्याचे भासवून ते लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचे. आतापर्यंत त्यांनी शेकडो लोकांकडून अंदाजे ४० ते ४२ लाख रुपये उकळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बदनामीच्या भीतीने अनेक लोक समोर येत नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
Web Summary : Ahmedabad police busted a gang posing as Kinnar gurus, blackmailing women. A woman was coerced into nude video calls, extorted ₹1.43 lakhs. One arrested, two absconding; racket cheated ₹42 lakhs from 300 people.
Web Summary : अहमदाबाद पुलिस ने किन्नर गुरु बनकर ब्लैकमेल करने वाले गिरोह का भंडाफोड़ किया। एक महिला को न्यूड वीडियो कॉल के लिए मजबूर किया गया, ₹1.43 लाख वसूले। एक गिरफ्तार, दो फरार; गिरोह ने 300 लोगों से ₹42 लाख ठगे।