शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या सात जणांच्या टोळीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 18:56 IST

शिताफीने पकडण्यात गुन्हे शाखा तीनच्या पोलिसांना यश

नालासोपारा (मंगेश कराळे) :- एका कंपनीतील सुरक्षा रक्षकाला मारहाण करून हातपाय बांधून ठेवत शनिवारी दरोडा टाकणाऱ्या सात जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी ३६ तासांच्या आत पकडण्यात यश मिळाले आहे. यांचे अजून कोणी साथीदार आहेत का ? याआधी कुठे असे दरोडे टाकलेले गुन्हे दाखल आहेत का ? याचा पोलीस शोध घेत तपास करत आहे.

वसई फाट्याच्या परमार इंडस्ट्रीयल इस्टेटमधील लिनीट एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत शनिवारी दुपारी दरोडा पडला होता. कंपनीत आठ दरोडेखोर येऊन सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जबरदस्तीने हात पाय बांधून ठेवून आयशर टेंपो आणून गोडाऊनमध्ये ठेवलेले ३ लाख ७८ हजारांचे दीड टन स्टेनलेस स्टीलचे रॉड जबरी भरून व सुरक्षा रक्षकाचा ५ हजारांचा मोबाईल चोरी करून निघून गेले होते. याप्रकरणी मनोज राणे (४०) यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. राष्ट्रीय महामार्गावर घडणाऱ्या   गुन्हयांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेवुन सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन पायबंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलीस पथकाने वेगवेगळे पथक तयार करुन गुन्हयातील आरोपीत यांचा तांत्रीक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने माहिती प्राप्त करुन गुन्हा घडल्याच्या 36 तासाच्या आत सापळा रचुन आरोपी बद्रीआलम खान (३६), ईरशाद अली (५४), मोहम्मद रफिक शहा (२७), मोहम्मद तोफीक शेख (३७), मजहर खान (२१), नजिर शेख (४०) आणि हाफिजउल्ला खान (२९) यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे प्राथमिक तपास केल्यावर सदर गुन्हयात आरोपींचा सक्रीय सहभाग निष्पन्न झाला आहे. पकडलेल्या सात आरोपीपैकी बद्रीआलम खान याच्यावर यापुर्वी नाशिक व ठाणे जिल्ह्यात अशाच प्रकारे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तपास सुरू आहे -

आरोपीत यांनी अशाच प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत, अगर कसे ? याबाबत अधिक तपास सुरु आहे. नमुद आरोपीत यांना पुढील कारवाई करीता पेल्हार पोलिसांकडे ताबा देण्यात आला आहे. - प्रमोद बडाख (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट तीन) 

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस