शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रोसिटीची भीती दाखवून डॉक्टरकडून उकळले ७५ लाख अन् घाटकोपरमधून आवळल्या मुसक्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 14:48 IST

डॉक्टर खंडणी प्रकरणातील फरार मनोज अडसुळला घाटकोपरहून केली अटक

ठळक मुद्देमनोज अडसुळ याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी फेटाळला होता. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून तो फरार होता.

पुणे - अ‍ॅट्रोसिटीची भिती दाखवून डॉ. रासने यांच्याकडून तब्बल ७५ लाख रुपये उकळणारा व गेले काही दिवस फरार असलेल्या मनोज अडसुळ याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने घाटकोपर येथून ताब्यात घेतले. आज सकाळी त्याला पुण्यात आणले आहे. 

मनोज अडसुळ याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी फेटाळला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. तो मित्राच्या वडिलांच्या घाटकोपरमधील पंतनगर येथील घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक रात्री घाटकोपरला दाखल झाले. त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास तेथे छापा घालून मनोज अडसुळ याला ताब्यात घेतले. याप्रकरणी डॉ. दीपक प्रभाकर रासने (वय ६९, रा. तपोवन सोसायटी, पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ ऑक्टोबर २०१९ रोजी डॉक्टरच्या मुलाच्या दवाखान्यात एक महिला आली होती.  ५०० रुपयांच्या तपासणी फि वरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर संबंधीत महिनेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात विनयभंग झाल्याचा तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी डॉक्टरची चौकशी केली असता, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य न आढळल्यामुळे पोलिसांनी ती चौकशी बंद केली. मात्र मनोज अडसुळ याने बनाव रचत ती महिला अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करीत आहे. तुमच्या मुलाला अटक होईल. त्याच्या पासपोर्टवर शिक्का पडले. त्याला परदेशात जाता येणार नाही, असे सांगून त्यांना घाबरुन सोडले होते. त्यांच्याकडून ७५ लाख रुपयांची खंडणी वसुल केली. उरलेले ५५ लाख रुपये देण्यासाठी मनोज याने त्यांच्यामागे तगादा लावला. तेव्हा डॉ. रासने यांनी पोलीस मित्र असलेल्या जयेश कासट याला ही बाब सांगितली. त्याने डॉक्टरांचे पैसे परत दे नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला आत टाकत. अशा धमक्या देऊन त्याच्याकडून ५ लाख रुपये लाटले. कासट याच्या सततच्या त्रासामुळे मनोज अडसुळ याने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कासट आपल्याकडे खंडणी मागत असल्याची तक्रार केली. त्याच्या अर्जाची चौकशी करता त्यानेच डॉ. रासने यांच्याकडून खंडणी वसुल केल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून तो फरार होता.

टॅग्स :ExtortionखंडणीArrestअटकGhatkoparघाटकोपरPuneपुणेdoctorडॉक्टर