स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 06:14 IST2026-04-26T06:13:54+5:302026-04-26T06:14:26+5:30
बँकेने सखोल चौकशी केली असता, ३.७९ कोटी रुपये किमतीच्या २२ पाकिटांमध्ये चक्क बनावट सोने आढळले.

स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
बदनापूर (जि. जालना) : येथील कॅनरा बँक शाखेतून तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांच्या सोन्याचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बँकेच्या स्ट्रॉंग रूममधून खरे सोने लंपास केले असून, बनावट दागिने आढळून आले आहे.
याप्रकरणी बँकेचे सहायक महाव्यवस्थापक केशवमूर्ती बी. व्ही. यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. बँक व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर, सुवर्ण मूल्यमापक प्रवीण प्रभाकरराव बुऱ्हाडे अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. तर बँक अधिकारी संजय डोंगरे हे मात्र फरार आहेत.
असा उघड झाला घोटाळा
बँकेच्या नियमानुसार २२ एप्रिल २०२६ रोजी सुवर्ण कर्जाच्या पाकिटांचे त्रैमासिक पुनर्मूल्यांकन सुरू होते. तपासणीदरम्यान काही पाकिटांमधील सोने बनावट असल्याचा संशय आला. बँकेने सखोल चौकशी केली असता, ३.७९ कोटी रुपये किमतीच्या २२ पाकिटांमध्ये चक्क बनावट सोने आढळले. धक्कादायक बाब म्हणजे, स्ट्रॉंग रूममधील इतर ३० सोन्याची पाकिटे (किंमत ३.५२ कोटी) गायब असल्याचेही समोर आले.