शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

५ रुपये ठरले जीवघेणे, रिक्षाचालकाची केली निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 18:26 IST

या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची पुढील चौकशी सुरू आहे.

ठळक मुद्देरामदुलार सरजू यादव (६८) हा मंगळवारी सायंकाळी सीएनजी स्टेशनवर आपल्या ऑटो रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी गेला होता. या प्रकरणी गॅस स्टेशनच्या पाच कर्मचाऱ्यांना भा. दं. वि. कलम ३०२ (हत्या) आणि इतर प्रासंगिक कलमांतर्गत अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली. 

मुंबई - बोरिवली परिसरात एका ऑटो रिक्षाचालकाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. त्याने सीएनजी गॅस स्टेशनवरील कर्मचाऱ्याकडे उरलेले ५ रुपये मागितले. त्यानंतर झालेल्या वादातून रिक्षाचालकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची पुढील चौकशी सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदुलार सरजू यादव (६८) हा मंगळवारी सायंकाळी सीएनजी स्टेशनवर आपल्या ऑटो रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी गेला होता. तेथून त्याने आपला मुलगा संतोषला फोन केला. २०५ रुपये गॅस भरल्यानंतर यादव यांनी गॅस स्टेशनच्या अटेंडंटला ५०० रुपयांची नोट दिली. त्याने २९५ रुपये परत करण्याऐवजी ५ रुपये कमी दिले आणि २९० रुपये दिले. यावर यादव यांनी आपले शिल्लक असलेले ५ रुपये मागितले त्यावेळी अटेंडंट संतोष जाधवने चालक आणि त्याच्या मुलाशी गैरवर्तणूक केली. तसेच इतर कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यात वयोवृद्ध रिक्षाचालक बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नामदेव शिंदे यांनी आम्ही या प्रकरणी गॅस स्टेशनच्या पाच कर्मचाऱ्यांना भा. दं. वि. कलम ३०२ (हत्या) आणि इतर प्रासंगिक कलमांतर्गत अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीauto rickshawऑटो रिक्षाDeathमृत्यूArrestअटक