शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
3
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
4
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
5
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
6
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
7
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
8
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
9
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
10
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
11
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
12
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
13
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
14
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

१९ वर्षीय शिक्षिकेवर मुख्याध्यापकाने केला बलात्कार; खेरवाडी पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 5:14 PM

खेरवाडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेवर केलेल्या बलात्काराप्रकरणी पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला

ठळक मुद्दे पीडित तरुणीने स्पाय कॅमेऱ्यात आपल्यावर झालेला दुर्दैवी प्रकार टिपला आहे. पीडित तरुणी ही ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत ती जुलै २०१७ पासून पार्ट टाईम शिक्षिकेचं काम करत होती.शाळेत शिक्षिकेचं काम करण्यासाठी रुजू झाल्यानंतरही कामानिमित्त घरी बोलावून पीडित मुलीवर मुख्याध्यापकाने बलात्कार केला.

मुंबई - वांद्रे पूर्वेकडील एका शाळेत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील मुख्याध्यापकाने १९ वर्षीय शिक्षिकेचा लैंगिक छळ केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने स्पाय कॅमेऱ्यात आपल्यावर झालेला दुर्दैवी प्रकार टिपला आहे. खेरवाडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेवर केलेल्या बलात्काराप्रकरणी पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल अशी माहिती खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  

पीडित तरुणी ही ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत ती जुलै २०१७ पासून पार्ट टाईम शिक्षिकेचं काम करत होती. मात्र, शैक्षणिक काळात ६ वर्षभर मुख्याध्यापकाने विद्यार्थी दशेत असताना तिचा वारंवार विनयभंग केला होता. शाळेत शिक्षिकेचं काम करण्यासाठी रुजू झाल्यानंतरही कामानिमित्त घरी बोलावून पीडित मुलीवर मुख्याध्यापकाने बलात्कार केला. बलात्काराबाबत कोणास सांगितल्यास तुझ्या लहान बहिणीला शाळेतून काढून टाकण्यात येईल अशी धमकी मुख्याध्यापकाने दिली होती. कारण ज्या शाळेत पीडित शिक्षिका होती त्याच शाळेत तिची लहान बहीण शिक्षण घेत होती. लहान बहिणीच्या शिक्षणाचं नुकसान होईल म्हणून बरेच दिवस पीडित शिक्षिका शांत होती. मात्र, नंतर याबाबत तिने उपमुख्याध्यापक, वरिष्ठ शिक्षकांना माहिती दिली होती. मात्र, कुणीही तिच्यावर विश्वास ठेवेना. हतबल झालेल्या पीडितेने अखेर मैत्रिणीच्या वडिलांना घडला प्रकार सांगितलं. त्यानंतर त्यांनी तिला स्पाय कॅमेऱ्याने सर्व प्रसंग टिपण्याची युक्ती सांगितली. त्याप्रमाणे पीडितेने पुन्हा मुख्याध्यापकाने तिला घरी बोलावले त्यावेळी स्पाय कॅमेऱ्यात सर्व प्रकार पीडितेने टिपला. मात्र, मुख्याध्यापकाला वाचविण्यासाठी अनेकांनी तिला कॅमेऱ्यातील शूट शाळेच्या प्रशासनाकडे देण्यास सांगितले. तरीदेखील तिने तसे न करता खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. याबाबत खेरवाडी पोलीस तपास करत असून लवकरच कारवाई करण्यात येईल अशी माहिती खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Rapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसSchoolशाळाTeacherशिक्षक