शिक्षक करायचा अनैसर्गिक अत्याचार; 14 वर्षीय विद्यार्थ्याने कापला त्याचा गळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 14:34 IST2023-09-03T14:34:45+5:302023-09-03T14:34:58+5:30
राजधानी दिल्लीत विद्यार्थ्याने अत्याचार करणाऱ्या शिक्षकाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शिक्षक करायचा अनैसर्गिक अत्याचार; 14 वर्षीय विद्यार्थ्याने कापला त्याचा गळा
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलाला त्याच्या शिक्षकाच्या हत्येप्रकरणी अटक झाली आहे. विद्यार्थ्याने आपल्या शिक्षवार धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. शिक्षकाने मुलावर अनेक वेळा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील जामिया नगर येथील एका खासगी शिक्षकाचे त्याच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक संबंध होते. शिक्षकाने विद्यार्थ्याचा अश्लील व्हिडिओही बनवला होता. विद्यार्थ्याने शिक्षकाच्या कृत्याचा निषेध केल्यावर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्ती करायचा. दोन दिवसांपूर्वीही आरोपी शिक्षकाने घाणेरडे कृत्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र आधीच तयारीत असलेल्या विद्यार्थ्याने पेपर कटरने शिक्षकाचा गळा चिरला.
दिल्ली पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वृत्तसंस्थेनुसार, बुधवारी दुपारी जामिया नगर बॉटल हाऊसमधील एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी तपास सुरू केल्यावर संपूर्ण प्रकरण उघड झाले. डीसीपी राजेश देव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा शिक्षक समलैंगिक होता आणि तो ट्यूशन घेणाऱ्या मुलांसोबत घाणेरड्या गोष्टी करायचा.