शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

बापरे! अवघ्या 10 वर्षांच्या मुलाने बँकेतून 30 सेकंदांत 10 लाख रुपये उडविले; सीसीटीव्ही पाहून पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 16:57 IST

सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक छोटा मुलगा त्या कोऑपरेटीव्ह बँकेमध्ये सकाळी 11 च्या सुमारास आला होता. त्याने कॅशिअरच्या केबिनमध्ये हळूच प्रवेश केला. त्या कॅशिअरसमोर ग्राहकही उभे होते.

इंदौर : मध्य प्रदेशच्या निमूच जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. एका 10 वर्षांच्या मुलाने बँक कर्मचारी, ग्राहकांच्या डोळ्यात धूळ फेकत केवळ 30 सेकंदांत तिजोरीतून 10 लाख रुपये उडविले आहेत. या चोरीमुळे बँक प्रशासनासह पोलिसांचेही डोळे विस्फारले आहेत. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक छोटा मुलगा त्या कोऑपरेटीव्ह बँकेमध्ये सकाळी 11 च्या सुमारास आला होता. त्याने कॅशिअरच्या केबिनमध्ये हळूच प्रवेश केला. त्या कॅशिअरसमोर ग्राहकही उभे होते. मात्र, यांच्यापैकी कोणालाही कळू न देता या मुलाने अवघ्या 30 सेकंदांत 10 लाख रुपये चोरले.

विशेष म्हणजे त्याने या तिजोरीतील नोटांची बंडले बॅगेत टाकली. ही चोरी त्याने अवघ्या 30 सेकंदांत केली. मात्र, तो बाहेर पडू लागताच अलार्म वाजू लागला आणि सुरक्षा रक्षक त्याच्या दिशेने धावला. त्याला पाहून हा मुलगाही पळू लागला. पोलिसांनी सीसीव्ही फुटेजमध्ये पाहिले तेव्हा त्याच्या आधी एक 20 वर्षांचा तरुण बँकेत आला होता. त्याने जवळपास 30 मिनिटे रेकी केली. त्याने या मुलाला या तिजोरीबाबत सांगितले आणि या मुलाने त्याच्या सांगण्यावरून चोरीचा प्रयत्न केला. 

कॅशिअर त्याच्या जागेवरून उठल्याचे पाहताच या तरुणाने त्या मुलाला आत जाण्याचा इशारा केला. त्या मुलाने आतमध्ये जात तिजोरीचा आड केलेला दरवाज उघडला आणि लगेचच 500 रुपयांची बंडले घेऊन पळ काढला. हा अल्पवयीन मुलगा उंचीने छोटा असल्याने कॅशिअरच्या काऊंटरसमोर उभ्या असलेल्या ग्राहकांना दिसू शकला नाही, असे निमुचचे पोलिस अधिक्षक मनोज राय यांनी सांगितले. फॉरेन्सिक एक्सपर्टही याचा तपास करत आहेत. बँकेबाहेरील सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसत आहे की, तो तरुण आणि मुलगा दोन दिशांना पळाले आहेत. या प्रकरणी आम्ही काही संशयितांना ताब्यात घेतले असून रस्त्यावरील स्टॉलधारकांनाही चौकशीसाठी घेतले आहेत. तसेच सुरक्षा रक्षकाचीही चौकशी सुरु आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा

...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल

सोने स्वस्त झाले! झटपट जाणून घ्या आजचे दर

फ्लिपकार्टचा कोरोनाकाळात चौकार! 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक; बाजारमुल्य $24.9 अब्जांवर

एकतर सैन्याची नोकरी सोडा किंवा फेसबुक; याचिकाकर्त्या लेफ्टनंट कर्नलला न्यायालयाने सुनावले

बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच माफी मागितली

'वर्क फ्रॉम होम' काळात SBI चा मोठा निर्णय; तब्बल 1000 कोटी रुपये वाचणार

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी