कलचाचणीचा आज ऑनलाईन निकाल

By admin | Published: April 25, 2016 12:27 AM2016-04-25T00:27:53+5:302016-04-25T00:27:53+5:30

पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअर निवडण्यासाठी साहाय्य मिळण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या कलचाचणीचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी १ वाजता ६६६.्र५ॅ२.ंू.्रल्ल या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

Today online trial of the trial | कलचाचणीचा आज ऑनलाईन निकाल

कलचाचणीचा आज ऑनलाईन निकाल

Next
णे : दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअर निवडण्यासाठी साहाय्य मिळण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या कलचाचणीचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी १ वाजता ६६६.्र५ॅ२.ंू.्रल्ल या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
दहावीच्या मार्च २०१६ च्या परीक्षेस प्रथमच बसलेल्या नियमित विद्यार्थ्यांचा कल अहवाल छापील स्वरूपात विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेबरोबर वितरित केला जाणार आहे. या कलअहवालात विद्यार्थ्यांचा कल व अभ्यासक्रम अथवा शाखा निवडीविषयी मार्गदर्शन असेल. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणा-या काही बाबी त्यावर असतील. शालेय शिक्षण विभागाने दि. १० नोव्हेंबर २०१५ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील इयत्ता १० वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचे शासनाने ठरविले होते. ही पहिलीच कलचाचणी फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेली ही कलचाचणी राज्यातून एकूण १५ लाख ४७ हजार २५३ विद्यार्थ्यांनी दिली होती.
कलचाचणीचा निकाल ऑनलाईन जाहीर करताना त्यासोबत विद्यार्थ्यांना त्यांचा कल नेमका कोणत्या क्षेत्राकडे आहे, याचेही विश्लेषण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन ही माहिती सोमवारपासून मिळेल. तर याचा अहवाल दहावीच्या गुणपत्रिकेसोबत वितरित केला जाणार असल्याची माहिती राज्य मंडळातील अधिकार्‍यांनी दिली.
दरम्यान, विविध शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती इत्यादी महितीसाठी विद्यार्थी व पालकांना ६६६.ेंँंूं१ीी१े्र३१ं.्रल्ल या संकेतस्थळावरून माहिती घेता येईल. यासोबतच ३ मे २०१६ पासून ८२७५१००००१ या हेल्पलाईन क्रमांकावर विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शन मिळेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
-----

Web Title: Today online trial of the trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.