शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्याजवळ तीन ठार

By admin | Updated: September 14, 2014 00:36 IST

कार ओढ्यात कोसळली : मृतांमध्ये मुलगी जावयासह कोल्हापूरचा उद्योजक

कोल्हापूर : कोल्हापूर येथून गोव्याकडे निघालेली मारुती स्विफ्ट कार ओढ्यात कोसळल्याने साखर कारखान्याचे बेअरिंग्ज उत्पादक लालसिंग जयसिंग रजपूत (वय ७८, रा. आर. के. नगर कोल्हापूर), मुलगी अल्पना महेश धमोणे व जावई महेश धमोणे हे तिघेजण ठार झाले. तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. आजरा-आंबोली मार्गावर सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास वेळवट्टीनजीक हा अपघात झाला.घटनास्थळावरून व आजरा पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, रजपूत हे कोल्हापूरहून आपले जावई महेश मुरारी धमोणे (३४, रा. बेळगाव), मुलगी अल्पना महेश धमोणे (३०) यांच्यासह कुटुंबीयांसवेत गोवा येथील मुलीकडे मारुती स्विफ्टमधून आजरामार्गे निघाले होते.गाडीमध्ये एकूण आठजण होते. गाडी वेळवट्टी धरणानजीकच्या वळणावर वेगाने आली असता वळणाचा अंदाज न आल्याने ती सुमारे ३० फूट खोल ओढ्यात कोसळली.यामध्ये कार चालवणारे महेश मुरारी धमोणे हे जागीच ठार झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांकडे बेबीताई लालसिंग रजपूत यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर त्यांना अपघात झाल्याचे समजले.अन्य वाहनचालकांनी गाडीतील जखमींना बाहेर काढले. लालसिंग रजपूत, अल्पना धमोणे, अमित लालसिंग रजपूत (३४) व शिखा महेश धमोणे (२), श्रीशा महेश धमोणे (१०), अनिता लालसिंग रजपूत (२५) व बेबीताई लालसिंग रजपूत यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना गडहिंग्लज येथे पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले.दरम्यान, अल्पना महेश धमोणे व लालसिंग रजपूत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमित व शिखा यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरात हलविण्यात आले. या दोघांची प्रकृती गंभीर आहे.अपघातानंतर अपघातस्थळी वाहनचालक व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. नेमकी माहिती उपलब्ध होत नसल्याने गोंधळ निर्माण झाला. या मार्गावरून जाणाऱ्या विजय राशिवडेकर या आजरा आगाराच्या वाहकासह दिनेश कुरुणकर व अन्य स्थानिक मंडळींनी जखमींना हलविण्यात मोठी मदत केली. (प्रतिनिधी)