विद्यार्थ्यांनी जागविली देशभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2017 02:06 IST2017-01-31T02:06:09+5:302017-01-31T02:06:09+5:30

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्ती जागविली़ विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध देशभक्तीपर गीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली़

Students awake patriotism | विद्यार्थ्यांनी जागविली देशभक्ती

विद्यार्थ्यांनी जागविली देशभक्ती

ळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्ती जागविली़ विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध देशभक्तीपर गीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली़
प्राचार्य बी़ वाय़ पांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले़ विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, सामाजिक, अंधश्रद्धा निर्मूलन आदींसह विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले़ यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक रोहोकले, ग्रामपंचायत सदस्य संदीप ठुबे, मेजर राजेंद्र रोहोकले, नागेश्वर सामाजिक प्रतिष्ठानचे संदीप रोहोकले, संतोष रोहोकले, संतोष भनगडे, पत्रकार संपत कपाळे, संतोष धोंडगे, रावसाहेब चेमटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सतीश शिर्के यांनी केले़

Web Title: Students awake patriotism